पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ व्यवहारमयूख. कात्यायन आणि मनु (अ० ८ श्लो० ८७-७९-८० हे साक्षीच्या जबान्या घे- ण्याची रीति सांगतात " सकाळचे प्रहरीं [ह्मणजे दोन प्रहरांपूर्वी ] ईश्वराची मूर्ति व ब्राह्मण यांचे समक्ष सर्वांची तोंडें उत्तरेस किंवा पूर्वेस करवून न्यायाधिशाने स्वतः शुचि- र्भूत होऊन द्विजांस खरी साक्ष देण्यास सांगावें. (८७) सर्व साक्षीस न्यायसभेचे म- ध्यभागी जमवून, वादिप्रतिवादींचे समक्ष, खालीं लिहिल्याप्रमाणें पहिल्याने सर्व साक्षीस उद्देशून बोलून सर्व साक्षींच्या जबान्या घ्याव्या. (७९) या मुकदम्यांतील वादिप्रति- वादींचे दरम्यान घडलेल्या गोष्टी ज्या तुह्मांस माहीत असतील त्या सर्व खरेपणाने सांगा. तुमच्या साक्षीची या मुकदम्यांत जरूर आहे." (८०) 66 गाई, घोडे, आणि इतर जनावरे यांचेबद्दलचे तंट्यांत दाव्यांतील विषयही ( ज्या ब- द्दल दावा असेल तें जनावर ) समक्ष हजर असले पाहिजे असें कात्यायनाचे ह्मण आहे “ वादिप्रतिवादींचे समक्ष व ज्याबद्दल दावा असेल त्या [ वस्तूच्या वगैरे ] जवळ न्यायाधिशानें त्यांस ( वादिप्रतिवादींस ) आपापल्या पुराव्याबद्दलच्या साक्षी हजर करण्यास उघडपणें सांगावें. पाठीमागें कधीं सांगू नये. वादिप्रतिवादी हजर नसले तरी दाव्यांतील विषयाचे जवळ [ कधीं कधीं पुरावा घेण्यास हरकत नाहीं . ] हा नियम चतुष्पाद जनावरें, द्विपाद आणि स्थावर वस्तु, यांचेबद्दलचे दाव्यास लागू आहे. तौल्य ( वजन करून घेण्याच्या वस्तु ), गणिम ( मोजून घेण्याच्या वस्तु), व मेय (मापून घेण्याच्या वस्तु ) अशांबद्दलचे दाव्यांत, दाव्यांतील विषय जवळ नसतां- ही, न्यायाधिशानें साक्षीच्या जबान्या घ्याव्या, परंतु इतर दाव्यांत असें करूं नये. १९३ ' तयोरपि विना क्वचित् ' ( ह्मणजे कधीं कधीं ते दोघे हजर नसतांही ) याचा अर्थ असा समजावा कीं, वादिप्रतिवादी हजर नसतांही चतुष्पादादिकांचे मुकदम्यामध्यें दाव्यांत मागितलेल्या वस्तूंचे सान्निध्य असतां ' तौल्यं ' ह्मणजे सोनें वगैरे वजन करून घेण्यालायक वस्तु. ' गणिमं ' ह्मणजे नाणे वगैरे मोजून घेण्याजोग्या वस्तु . ' मेयं ' ह्मणजे तांदूळ, गहूं वगैरे मापून घेण्याच्या वस्तु. ' अभावेपि ' ह्मणजे [ तोलून वगैरे घेण्यासारख्या वस्तूंप्रमाणें ] दाव्यांतील मागितलेली वस्तु हजर नसतांही. 'क्रियाकारेषु' ( दाव्यांत ) ह्मणजे दाव्यांतील कायदेशीर कामांत. खुनाचे मुकदम्यांत शिवाचे सन्निध (णजे शिवाचे देवळांत किंवा शिवलिंगाजवळ ) साक्षांकडून जबान्या देववाव्या, असें तोच स्मृतिकार सांगतो “ प्राण्यांचे खुनाचे मुकदम्यांत, खुनाच्या खुणा वगैरे नस- तील तर, शिवाचे सन्निध साक्षांकडून पुराव्याबद्दल जबान्या देववाव्या; परंतु जर खुणा असतील, तर मुकदम्यांत त्या दाखल करून त्यांबद्दल पुरावा करवावा ". ह्मणजे जो पुरावा खुनाच्या खुणा नसतां शिवाचे सन्निध साक्षांकडून जबान्यांचे द्वारें 66 ९३ बी० प० ५२ पृ० २. 'तत्'"