पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १३५ साक्षीच्या जबान्यांस प्रारंभ होण्यापूर्वी [ त्या विषयावरील ] शास्त्रोक्त नियमांचा आधार दाखवून गुप्त दोष बाहेर काढावे. त्यानंतर त्या दोषांबद्दल बोलूं नये असें बृहस्पति सांगतो " साक्षीमध्ये किंवा [ पुराव्याचे ] लेखांत जे काय दोष असतील किंवा त्या- बद्दल ज्या कांहीं हरकती असतील त्या सर्व साक्षींच्या जबान्या होण्याचे पूर्वी दाव्याचे चौकशीचे वेळेस जाहीर कराव्या; परंतु त्यानंतर त्या जाहीर केल्यास त्या जमेस धर- ल्या जाणार नाहींत व तेणेंकरून साक्षींस किंवा पुराव्यास दोष लागला जाणार नाहीं.' ' उक्तान् ' ह्मणजे बोलण्यास ज्यांनी आरंभ केला त्यांस ' उक्तान्' या शब्दाचे अंतींचा 'क्त' प्रत्यय ' आदिकर्मणि क्तः कर्तरि च ' असें पाणिनीचें सूत्र आहे त्या आ- धाराने झालेला आहे. 66 9989 ज्या अशा ठिकाणी त्यांस शिक्षा काय हैं कात्यायनानें सांगितलें आहे साक्षांस पूर्वी दोष दिला नव्हता अशा साक्षींस तंट्यांवरील विषयाचे संबंधानें साक्षी- च्या जबान्या झाल्यानंतर जर कोणी ते साक्ष देण्यास अयोग्य होत असा दोष देईल आणि अशी तकरार करण्यास आधारभूत कारणें दाखविणार नाहीं, तर त्यास स्वल्प ( प्रथम साहस ) दंड करावा. साक्षीवर जो दोष आणला असेल त्या दोषाचें वार- ण जर खुद साक्षींच्यानें करवत नसेल तर ज्या पक्षकाराचें त्यांत हित आहे त्या पक्षकाराने करावें असें बृहस्पति ह्मणतो " मुकदम्यांत ज्या पक्षकाराचे दस्तऐवजास किंवा सक्षस दोष दिला गेला असेल, त्या पक्षकारानें तो दोष दूर केल्यावांचून त्यास फैसला मिळणार नाहीं." 'तत्' ह्मणजे दस्तऐवज वगैरे. खोटें साक्षी बनविणारास शिक्षा कात्यायन सांगतो " जो कोणी आपले तर्फे फैसला मिळविण्यासाठी खोटे साक्षी देतो त्याचें सर्वस्व हरण करून त्याचा मुकदमा बुडवावा. १९२ 'निर्विषयं ' - णजे दाव्यांत मागितलेले.. न मिळालेला खोट्या साक्षींच्या खोटेपणाचा कसा निर्णय करावा याबद्दल नारद सांगतो स्वतःच्या दुष्कृत्यांच्या कारणामुळे जो [ साक्षी ] अस्वस्थता दिसतो, आपण उभे राहण्याची जागा वरचेवर बदलतो, किंवा एकाद्या- च्या मार्गे [ दडण्याकरितां ] धांवतो, एकाएकीं जो मोठ्यानें खोकूं लागतो, व वारंवार मोठ्यानें सुस्कारे टाकतो, पायानें जो जमीन उकरतो, जो आपले हात व वस्त्रे [वां- रंवार ] हालवितो, ज्याच्या चेहऱ्याचा रंग पुनः पुनः उतरतो, ज्याचे कपाळाला घाम सुटतो, ज्याचे ओंठ कोरडे पडतात, आपल्या वरचे बाजूस व भोंवतालीं जो पहात रा- हातो आणि फार घाईनें बोलतो, जो फार असंगत भाषण करतो, किंवा जो विचार के- यावांचून बोलतो तो खोटा साक्षी जाणावा. अशा दुष्टास सक्त शिक्षा करावी. "१३ 66 ९१ वी० ५० ५१ पृ० २. ९२ वी० प० ५२ पृ० १.