पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ व्यवहारमयूख. " ८८ क्षकार व्यर्थ दोष लावील तो [ दाव्यांतील ] रकमेइतक्या दंडास पात्र होतो. ' वादी ' ( पक्षकार ) येथें प्रतिवादी समजावयाचा. ' तत्समं ' ( त्याचे इतका ) - णजे दाव्यांत जेवढी रक्कम मागितलेली असेल तितका व्यास " साक्षीं वे दोष प्र- तिवादीने राजसमेत ( कोर्टात ) सांगावे; ते लिहून घ्यावे; ते [ साक्षींस ] वाचून दाख- विल्यावर [ साक्षींकडून ] त्यांचा जबाब घ्यावा. " याचा अर्थ असा कीं, लिहून घेत- लेले दोषांचा विचार करून त्याबद्दलचा खात्रीलायक खुलासा सभासदांनीं साक्षिदारांकडून करून घ्यावा. तोच स्मृतिकार पुनः ह्मणतो 'दावा कबूल केल्याचा जबाब अस- ल्यास [ प्रतिवादीतर्फे ] साक्षिदारांस बोलावणें कधींच योग्य नाहीं. दुसऱ्या प्रकारचा जवाब असल्यास प्रतिवादीनें पुरावा देऊन [ वादीने दाखल केलेले साक्षींचें ] वारण करा- वें. 66 6 भाव- प्रतिवादीकडून साफ रीतीनें वारण न झाल्यास त्यानें दंड दिला पाहिजे; त्यानें. [ वादीचे ] साक्षींचें वारण केल्यास किंवा त्यांचे ह्मणण्याचे उलट ह्मणणारे साक्षी दाखल केल्यास ते [ वादीचे ] साक्षी नालायक ह्मणून नाकबूल करावे. त्याच रीतीनें [ उलट पक्षाचे योग्य ] साक्षींच्या देखत जर वादी स्वस्थ बसेल ( त्यांचे वारण करण्याचा उद्योग करणार नाहीं ), तर कायदेशीर दंड त्यानें दिला पाहिजे. " ' अतोन्यथा ' ( तर्से नसेल तर ) ह्मणजे कबूलजबाबाशिवाय दुसऱ्या प्रकारचा जबाब असल्यास. 'नीयाः ' ह्मणजे त्यानें साक्षींचे दोष त्यांजकडून कबूल करवावे, किंवा त्यांचे पदरांत घा- लावे. ' क्रियया ' ह्मणजे पुराव्यानें साक्षींचे दोष त्यांचे पदरांत घालणें तें जितका संभव असेल तितक्या स्पष्ट रीतीनें झालें पाहिजे असा अर्थ. " [ अमुक साक्षी होण्यास. लायक नाहीं किंवा त्याला अमुक दोष आहे. ही गोष्ट लोकप्रसिद्ध असल्यास किंवा सभासदांस ठाऊक असल्यास ती त्यांनीं कबूल करावी ; [ अशा ] दोषाबद्दल किंवा नालायकी ] बद्दल पुरावा पाहिजे असें समजावयाचें नाहीं," *. अशी (व्यास) स्मृति आहे ती, जे लोक सत्यवादी असें जगजाहीर आहे त्यांविषयीं आहे. पण प्रतिवादीस हे दोष माहीत नसतील तर त्या ठिकाणीं कसें करावें याविषयीं तोच स्मृतिकार सांगतो. " पुराव्यांत जे दोष असतील ते पक्षकारांनी बाहेर काढावे ; आणि जे गुप्त दोष असतील त्यांचा खुलासा शास्त्राचे द्वाराने वेळीं सभसदांनी करावा. " याचा अर्थ असा कीं, ८८ वी० प० ५८ पृ १. ८९ “ अभावयन्दमंदाप्यः " या ठिकाणी ' असाधयन्दमंदाप्यः ' असाही पाठ मिताक्षरामंथांत आहे (मि० व्य० प० २९ पृ० १ ). तसेंच वीरमित्रोदयमंथांतही ( वी० प० ५१ पृ० २. )

  • असें न केल्यास एका साक्षीचा दोष शाबीत करण्यास दुसरा साक्षी, दुसन्यास तिसरा असा अमर्याद गोंधळ होईल.

९० 'सभासदां दूषणं' या ठिकाणी 'सभासदां प्रसिद्धं यत्' असा पाठ वीरमित्रोदयांत आहे: प ५१ पृ०१.