पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १३३ असावे. [परंतु तसे न मिळाल्यास ] सर्व वर्णाचे साक्षी सर्व वर्णांस उक्त आहेत. " वर्ज्य साक्षी कोणते हें तोच स्मृतिकार सांगतो ( व्य० श्लो० ७०–७१ ) “स्त्री, अज्ञान मूल, वृद्ध, जुगारी, झिंगलेला, भूतपिशाचादिकांची बाधा झालेला, वाईट ख्यातीचा, रंगभूमीवर नाटके करणारा, नास्तिक, खोटे कागद करणारा, लुला, पांगळा वगैरे, जाति- भ्रष्ट, स्नेही, दाव्यांतील प्रकरणांत हिताहित असलेला, भागीदार, शत्रु, चोर, साहसकर्मी, लबाड ह्मणून प्रसिद्ध असलेला, व स्वजनांनी सोडलेला, इत्यादिक पुरुष साक्षीस अयोग्य होत" 'निर्धूतः' ह्मणजे स्वजनांनी सोडलेला. 'निर्धूताद्याः' यांतील ' आदि ' शब्दानें दासादिक घ्यावयाचे. बृहस्पति " आईचा बाप, चुलता, बायकोचा भाऊ व मामेभाऊ, स्नेही, आणि जांवई हे सर्व वादांत अयोग्य साक्षी होत. १८५ नारद " बोलावलें नसून जो पुरुष आपलेच इच्छेनें येतो व बोलतो ( ह्मणजे साक्ष देतो) त्यास ' स्वयमुक्ति: ' अशी विशेष संज्ञा आहे. हा साक्षी होण्यास योग्य नाहीं. " कात्यायन " पक्षकारानें लिहून दिलेल्या किंवा बोलावणें केलेल्या साक्षींपैकीं एक जर खोटें बोलेल तर बाकीचे सर्व साक्षी अयोग्य साक्षी होतात. " ८६ ज्यांस वर अयोग्य किंवा अग्राह्य असें ह्यटलेलें आहे अशा साक्षींस कांहीं प्रकारचे मुकदम्यांत साक्षी देण्याची लायकी आहे असें नारद सांगतो “ गुलाम, वाईट चालीचे, व ज्यांस अयोग्य साक्षी असें ह्यटलेले आहे ते, हे सर्व पुरुष तंट्यांत विषयाच्या महत्वा- च्या योग्यतेनुसार घेण्यास लायक साक्षी होऊं शकतात. " [दुसरे ] साक्षी नसल्यास काय करावें तें मनु सांगतो ( अ० ८ श्लो० ७० ) " [ ज्या दाव्यांत ] साक्षी नस- तील तेथें एकादी स्त्री, अज्ञान मूल, वृद्ध, शिष्य, किंवा ज्ञातिबंधू, किंवा गुलाम, किंवा नोक- र पुरावा देण्यासाठी घ्यावा. " याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ७२) “जारकर्म, चोरी, मारामारी, आणि साहस या मुकदम्यांत कोणीही साक्षी होण्यास योग्य आहे. " जार- कर्म वगैरेचा समावेश साहसांत असून पुनः जारकर्म वगैरे अपराधांची स्मृतींत निरनिराळी गणना केली आहे ह्मणून येथें जार कर्मादिक जे अपराध गुप्तपणानें होतात त्यांस हैं वचन लागू करावयाचें. उशनस् ! स्मृतिकार ] ह्मणतो “गुलाम, आंधळा, बहिरा, रक्तपिती रोग झालेला, स्त्री, अज्ञान आणि वृद्ध वगैरे हे देखील, साहसाचे ( मोठ्या अपराधाचे ) मुकदम्यांत योग्य साक्षी असे धरलेले आहेत, मात्र ते पक्षपाती नसावे. " " अनभिसंबद्धाः ' ह्मणजे निष्पक्षपाती. बृहस्पति “ मुकदम्यांत ८७ बोलाविलेले साक्षी जर सदोष असतील तर त्यांचे दोष बाहेर काढण्यास विरुद्ध पक्षास मोकळीक आहे. परंतु निर्दोष साक्षीस जो प- ८६ वी० प० ४८ पृ० १. ८७ ' साक्षिणोऽर्थे ' या ठिकाणीं वीरमित्रोदयांत 'साक्षिणोर्थी' असा पाठ आहे. ८४ वी० प० ४७ पृ० २. ८५ बी० प० ५ पृ२.