पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. कत्र करण्याचा कायद्याचा आशयं दिसत नाहीं. तथापि योग्य कारणावांचून विवाह- धर्म तोडणाऱ्यांवर कांही कायद्याची सक्ती असावी अमें मनांत आणून प्रतिवादी सहा महिनेपर्यंत कैदेस व मिळकतीच्या जप्तीस पात्र आहे असे ठरालेिलें आहे. या- पलीकडे कायदा कांही मदत करीत नाहीं असे दिसतें. परंतु नवऱ्यानें बायकोला आपल्या घरी नांदण्यास आणण्यासाठी केलेल्या दाव्यांत नवन्यास रक्तपितीचा किंवा गरमीचा उपद्रव आहे असे शाबीत होईल तर वादीचा दावा रद्द होतोः ( बाई प्रेम - कुंवर वि० भिका कल्याणजी मुं० हा०र० व्हा० ५ अ० शा० पा० २०९). नव- ज्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले इतक्यावरून स्त्रीस नवऱ्याच घर सोडून दुसरीकडे राहा- ण्यास हिंदु रिवाजाप्रमाणे कारण होत नांहीं.- ( राम्या वि॰ भजी मुं० हा० रि० व्हा० १ पा० ६६; नथुभाई वि० जव्हेर इं० ला० रि० मुं० व्हा० १ पा० १२१ ). नव- घ्यानें आपल्याजवळ राहण्यासाठी स्त्रीवर आणलेल्या दाव्यांत नवऱ्याची तिच्याशीं वर्तणूक फार जुलुमाची व सक्तीची आहे असा प्रतिवादीतर्फे जुबाव कायदेशीर होतो खरा, परंतु तो जुलूम किंवा सक्ती शरीरास्त इजा करणारी किंवा अशी इजा होईल अशी भीति उत्पन्न करणारी अमली पाहिजे. व्यभिचाराचा खोटा आरोप नवऱ्याने केला इतक्यावरून स्त्रीस बाळगण्याच्या त्याच्या हक्कास बाघ येऊं शकत नाहीं. नवऱ्यानें आपल्या जुलमी किंवा गैरशिस्त वागणुकीनें आपले वैवाहिक हक्क घालविले, किंवा स्त्रीला घराबाहेर घालविलें, किंवा दुसऱ्या कोणत्या गैरवागणुकीनें जर घरांतून बाहेर जाणें तिला भाग पाडलें, असें झालें नसेल तर नवऱ्याचें घर सोडून जाणाऱ्या स्त्रीला जो आपल्या घरीं जागा देईल, व नवऱ्याकडून ताकीद आली. असतांही नंतर आपल्या घरी राहूं देईल त्यावर नुकसानीची फिर्याद नवरा आणूं शकतोः ( यमुनाबाई वि० नारायण मोरेश्वर पेंडसे इं० ला० रि० मुं० व्हा० १ पा० १६४ ). एकानें आपल्या सास्वेवर फिर्याद आणून असा हुकुमनामा मिळविला की, तिनें आपल्या मुलीस ह्मणजे याच्या बायकोस त्याच्याकडे येण्याच्याकामी प्रतिबंध करूं नये. हुकुमनाम्यानंतर ही मुलगी आई- पाशींच राहत होती, परंतु मुलगी वयांत आलेली होती, व असा पुरावा झाला नाहीं कीं घरी राहूं देण्याहून अधिक कोणताही प्रतिबंध आईनें केला होता. कोर्टाचा टराव कीं, आक्ट ८, सन १८५९, कलम २०० प्रमाणे सास्वेविरुद्ध बजावणी करतां येण्यास फक्त घरीं राहू दिलें याहून कांहीं तरी ज्यास्ती केल्याचा पुरावा पाहिजे.- ( अज्ञासी कुंवार वि० सूरज प्रसाद इं० ला० . रि० अला० व्हा० १ पा० १०५). इंग्रजी कायद्याप्रमाणे नवराबायको यांस एकत्र राहण्याबद्दल एकमेकांवर फिर्याद आणितां येते, तशी हिंदुधर्म- शास्त्रानेंही आणितां येते, एवढ्यावरून सर्व प्रकारें दोन्ही कायद्यांचे नियम समान आहेत