पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ व्यवहारमयूख. 66 होत असेल असा एकच साक्षी [ सर्व प्रकारचे मुकदम्यांत आणि ] विशेषतः फौजदारी मुकदम्यांत पुरे आहे." 'अनुभूतवाक्' ह्मणजे जो नेहेमीं सत्य बोलतो असें अनुभ- वास आलेलें असतें तो. कात्यायन ह्मणतो कीं, ठेवींचे किंवा त्यासारख्या इतर मुकद- म्यांत आप्त (सत्यवादी ) ह्मणून प्रसिद्ध नसलेला एक देखील साक्षीदार पुरे आहे. अ- त्यंत गुप्त रीतीनें ठेविलेल्या ठेवीचे संबंधानें एक देखील साक्षीदार पुरे आहे असें ठरविलेलें आहे; वापरण्यासाठी घेतलेले वस्तूचे संबंधानें वादीने दिलेला एकच साक्षी देखील पुरे "वरण्यास हरकत नाहीं. " ' याचितं ' ( वापरण्यासाठी घेतलेली वस्तु ) ह्मणजे दागिने वगैरे; जसें कानांतील बाळ्या वगैरे लग्नादि प्रसंगी मागून आणलेल्या. 66 विक्रीसंबंधाचे तंट्यांतही एक साक्षी पुरे आहे असें त्याच स्मृतिकाराचें मत आहे 'विकण्यासाठी ज्या मनुष्यानें वस्तु केली असेल तिची शाबिती त्यानेच केली पाहिजे. त्यासंबंधाचे दाव्यांत तोच खुद्द एकटा साक्षी प्रमाणभूत आहे असें धरलेलें आहे. १,८२ साक्षात काय गुण असले पाहिजेत हे व्यास सांगतो "न्याय, अन्याय समज- ण्याचें ज्यांचे अंगीं सामर्थ्य असेल, पुत्रवान् पुरुष, पूर्वज ज्यांचे विख्यात, कुलीन घरा- ण्यांतील, सत्यवादी, वेद व स्मृति यांत सांगितलेल्या क्रिया करणारे, द्वेष व मत्सर ज्यांस नाहीं, श्रोत्रिय (वेदवेत्ते), जे परतंत्र नाहींत, विद्यासंपन्न, जे प्रवासी नव्हत (ह्म- णजे स्वग्रामी राहणारे), व जे आपल्या तारुण्यभरांत असतील, अशा पुरुषांस ज्ञात्या पुरुषांनी कर्जाबद्दलचे वगैरे दाव्यांत साक्षी करावे. 66 नारद ह्मणतो श्रेणीसंज्ञक मंडळ्यांचे संबंधानें त्यांतील मुख्य मुख्य; 'वर्ग' नांवाचे ( जमातींचे) संबंधानें त्या त्या जमातीतील मुख्य मुख्य; बाहेरील लोकांचे संबंधानें बाहेरील लोक; आणि स्त्रियांचे संव- धानें स्त्रिया साक्षी होत". ( ८१ ) कात्यायन वर्गी ( ह्मणजे वर्गसंज्ञक जमातींचे मुख्य ) कोणास ह्मणावें याविषयीं सांगतो " लिंगी ( कांहीं चिन्ह धारण करणारे), श्रेणी, पूग व इतर व्यापारधंदे करणारांच्या जमाती, व दुसऱ्या जमातींचे किंवा जा- तींचे लोक या सर्वांस ‘वर्ग' असें भृगु ह्मणतो. “दास ( गुलाम ) नांवाच्या जमातींचे नायक, चारण (भाट) नांवाच्या जमातींचे नायक, मल्ल नांवाच्या जमातींचे नायक, हत्ती, घोडे, व गाड्या हांकण्याचा धंदा करून पोट भरणारे लोकांच्या जमातींचे नायक, यांस वर्गी असें ह्मणतात. " (८१) निरनिराळ्या जातींच्या साक्षींविषयीं याशव- • ल्क्य सांगतो ( व्य० श्लो० ६९ ) " [असें समजावें कीं ] साक्षी तिहींपेक्षां जास्ती असावे. ते श्रुति व स्मृति यांत सांगितलेल्या धर्मांनीं चालण्यांत तत्पर व त्याच जा- तीचे (ज्या पक्षकाराचे तर्फे साक्षी असतील त्या पक्षकाराचे जातीचे ) व त्याच वर्णाचे ८२ बी० प० ४७ पृ २. ८३ वी० प०४६ पृ० १.