पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. साक्षी- १३१ ८० आतां साक्षींविषयीं. टोडरानंद [ ग्रंथांत] नारद ह्मणतो " वाद करणाऱ्या दो- न पक्षकारांत ज्या गोष्टींविषयीं संशय पडतो त्या गोष्टींचा खुलासा त्या गोष्टी ज्या पुरु- षांनी पाहिलेल्या किंवा ऐकिलेल्या असतील त्या पुरुषांच्या साक्षींचे द्वारे करावी. " बृहस्पति साक्षींचे भेद सांगतो " साक्षींच्या बारा जाति सांगितलेल्या आहेत : (१) लेखी, ( २ ) लिहवलेला, (३) गुप्त, (४) आठविलेला, (५) कुटुंबांतील मनुष्य, (६) निरोप्या, (७) स्वेच्छेनें झालेला साक्षी, . ( ८ ) उत्तरसाक्षी, ( ९ ) व्यापारधंद्यांत ने- मलेला तिन्हाईत माणूस, (१०) राजा, (११) त्याचा देखरेख्या, आणि (१२) गांवांतील लोक. ” “ लिखितः ' (लेखी) ह्मणजे वादीनें दस्तऐवजांत लिहिलेला. 'गूढ : ' (गुप्त ) - 6 [ प्रतिवादी काय ह्मणतो ] हैं ऐकण्यासाठी एकादे पडद्याआड किंवा अशाच रीती- नें बसविलेला. ‘स्मारितः' (आठविलेला) ह्मणजे कार्याची ज्यास वारंवार आठवण दिली. जाते तो. 'यादृच्छिक ' (स्वच्छेनें आलेला) ह्मणजे आपल्याच इच्छेनें साक्ष देण्यास अलेला. 'उत्तर:' ( उत्तरसाक्षी ) ह्मणजे साक्षी काय ह्मणाले हे त्यास सांगितल्यावर किंवा साक्षी ह्मणणे ऐकून नंतर जो बोलतो तो. अध्यक्षः ' ह्मणजे न्यायाधीश.. पुढील कात्यायन स्मृतीवरून सभासद व न्यायसभेतील इतर सभासद या सर्वांचा सं- ग्रह ' अध्यक्षः ' या शब्दानें होतोः " " लेखक, न्यायाधीश, आणि सभासद हे अनुक्र- मानें [ एकाचे अभावी दुसरा याप्रमाणें ]". तोच स्मृतिकार ( बृहस्पति ) ह्मणतो अथवा तीनही [ चालतील ]. साक्षी जर दोनच साक्षी पुरे आहेत, जास्तीची जरूर 66 ' [ दाव्यांत ] नऊ, सात, पांच, किंवा चार, श्रोत्रिय ( ह्मणजे वेद जाणते ) असतील तर नाहीं; एकच साक्षी कधीं घेऊं नये. लेखी व गुप्त साक्षी [ प्रत्येक जातीचे ] दोन दोन असावे; स्वेच्छेनें झालेला, आठविलेला, कुटुंबांतील पुरुष, व ज्यास उत्तरसाक्षी झटले- लें आहे तो हे साक्षी तीन, चार, किंवा पांच असले पाहिजेत; जर साक्षी हा निरो- प्या, हिशेबनीस, व्यापारधंद्याचे काम नेमलेला, राजा, किंवा न्यायाधीश असेल तर एकच साक्षी पुरे आहे." (८१) लेखी साक्षी किंवा असाच दुसऱ्या जातीचा साक्षी त्या-- ची जबानी जर उभयपक्षांच्या संमतीनें घेणें असेल तर एकच पुरे आहे असें याश- वल्क्य ह्मणतो ( व्य० श्लो० ७२ ) " उभयपक्षांचे संमत असल्यास श्रुति आणि स्मृति यांतील सर्व धर्म जाणणाऱ्या अशा एकाच पुरुषाची साक्ष [ पुरे ] आहे. व्यास " ज्या- ची कर्मे निर्दोष आहेत, धर्मशास्त्रांत जो प्रवीण, आणि ज्याचें वचन सत्य आहे असें मा- ७९ वी०प०४४. पृ.२. ८० वी० ५० ४५ पृ० २. ८१ वी० प० ४७ पू० २०