पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० व्यवहारमयूख. समजूं नये. हारीत असेंच ह्मणतो " हक्काचे संपादकाने आपले हक्काची शाविनी 'न केल्यास तो दंडास पात्र आहे, परंतु त्याचा पुत्र किंवा पुत्राचा पुत्र हे दंडास पात्र नाहींत. तरी संपादक जसा उपभोगलेले वस्तूचे हानीस पात्र आहे तसेच त्याचे पुत्र आणि पौत्र हेही हानीस पात्र होतात. " ७४ याज्ञवल्क्य (व्य० श्लो० २९ ) " ज्याचे हक्काविषयीं तकरार पडली आहे तो [ तशांत ] मेल्यास त्याचे वारसांनी हक्काची शाबिती केली पाहिजे. अशा मुकदम्यांत हक्कावांचून नुसत्या उपभोगाची शाबिती हैं प्रमाण नव्हे. रिक्थी' ह्मणजे पुत्रादिक दायांचा हिस्सा घेणारा. 'तं ' ह्मणजे हक्कास.. 6 फार दिवसांपासून तात्रा असणें हें प्रमाण आहे. परंतु याज्ञवल्क्य स्मृतीचे ता- त्पर्यार्थाशी ही गोष्ट विरुद्ध आहे. कारण कीं, [ विरुद्ध पक्षाचा ] थोडा वेळपावेतों जरी ताबा असेल तरी वादीचा दावा बुडतो. [ ही मोठी अडचण आहे ]. तो स्मृतिकार ( याज्ञवल्क्य व्य० श्लो० २४ ) ह्मणतो " जो मनुष्य स्वतःच्या जमिनीचा उपभोग वीस वर्षांपावेतों आणि पैशाचा उपभोग दहा वर्षांपावेतों [ कांहीं तकरारीवांचून ] दुसऱ्यास करूं देतो तो त्यास ( जमिनीस व पैशास ) मुकँतो." [ पण ही अडचण ] अशा रीतीनें दूर होते. या स्मृतीचा इतकाच अर्थ कीं, जो मनुष्य स्वतः तकरार केल्यावांचून जोपावे- तों जमीन किंवा पैसा दुसऱ्याचे उपभोगांत, राहूं देतो तोंपावेतों त्याचें दरम्यानचे उत्पन्न मात्र बुडतें; त्याची जमीन व द्रव्य जातात असा अर्थ नाहीं. असा अर्थ न केल्यास " जो मनुष्य हक्कावांचून उपभोग घेतो इत्यादिक " जी स्मृति वर लिहिली आहे तिच्याशी या वचनाचा विरोध येईल. कात्यायन "पशु, स्त्री, पुरुष वगैरेस जबरदस्तीने घेणारानें किंवा त्याच्या पुत्राने उपभोगाचे जोरावर कोणतीही तकरार करू नये,” असा नियम ठरविलेला आहे.७८ नारद 'गहाण ठेविलेली वस्तु, चतुःसीमा, अज्ञान मनुष्याचा पैसा, मोहोरबंद ठेव, चालू ठेव, अथवा स्त्री ; राजाची किंवा श्रोत्रियाची मालमिळकत ; ही दुसऱ्याचा ताबा असल्याचे कारणानें त्यांवरील धन्याची मालकी कधीही नष्ट होत नाहीं. " मनु (अ० ८ श्लो० १४६ ) " दूध देणारी गाय, उंट, बसण्याचा घोडा, शिकविण्यासाठीं (फेरफटका वगैरेसाठी ) दिलेलें जनावर, अशा स्नेहसंबंधास्तव वापरल्या जाणाऱ्या वस्तु ह्यांवरील धन्याची मालकी कधीं जात नाहीं. " 66 णजे 'शिकविण्यासाठी स्वाधीन केलेलें.' 4 'दम्यः प्रयुज्यते ' - समाप्त. ताब्याबद्दलचे प्रकरण समाप्त. ७६ मि० व्य० प० १५ पृ० १ ७८ मि० व्य० प० १२ पृ० १. ७७ वी० प० ६२ पृ० २.