पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय. १२९ ठवण न राहण्यासारखें कालांतर झालेले असल्यास अप्रतिबंध भोगवटा ( ताबा ) हे योग्य 66 6 6 66 प्रमाण होय असें तोच स्मृतिकार ह्मणतो. ती स्मृति अशी मनुष्याच्या आठवणी- च्या मर्यादेंतील [ काळाचे संबंधानें ] जमिनीचा भोगवटा शाबीत धरण्यापूर्वी, हक्काव- रून त्या जमिनीचा भोगवटा केलेला होतो, असें शाबीत करवणे इष्ट आहे. पण मनु- प्याचे आठवणीचे मर्यादेबाहेरील [ काळाचे संबंधांत ] हक्काचा पुरावा नसला तरी, तद्वि- रुद्ध पुराव्याचे अभावास्तव सतत तीन पिढ्यांचा भोगवटा पुरे आहे. " अनुगमाभावात् ' ( पुराव्याच्या अभावास्तव ) याचा अर्थ असा की, हक्क नाहीं असें शाबीत करण्यासाठी साक्षात् पुरावा मिळण्याचा तादृश संभव नसत्त्यामुळे तसें ( हक्क नाहीं है ) शाबीत करतां येत नाही ह्मणून. आठवण राहण्याजोग्या काळाचे मर्यादेपलीकडील दाव्यांचे संबंधानें जर 'हक्क नाहीं' अशी परंपरेनें दंतकथा चालत आलेली असेल, तर तेथें काय करावें हें नारद सांगतो हक्कावांचून शेंकडों वर्षीपावेतों जरी कोणी उपभोग घेतलेला असेल तरी चोरास जी योग्य शिक्षा ती त्यास राजाने करावी. १७४ परंतु [ सांप्रतचे वहिवा- टणाराचे ] "बापासुद्धां जर तीन पिढ्यांपावेतों अन्यायानेही ज्याचा उपभोग घेतलेला असेल ते त्यापासून ( उपभोग घेणारापासून ) परत घेतले जाणार नाहीं, कारण सतत तीन पि- ढ्यांपासून याचा उपभोग होत आलेला आहे " असें त्याच स्मृतिकाराचें ह्मणणें आहे त्याचा अर्थ असा की, हक्क नसतांही बापासुद्धां तीन पिढ्यांपावेतों ज्याचा उपभोग झा- लेला असेल तेंही जर त्याकडून (उपभोगणारापासून ) परत घेतां येत नाहीं, तर जेथें प्रत्यक्ष पुरावा होण्याचा तादृश संभव नाहीं, तेथें तें परत घेतले जाणार नाहींच नाहीं. “ उपभोगाचे आरंभापासून योग्य हक्क नसून पूर्वीचे तीन पुरुषांनी ज्याचा उपभोग केलेला आहे ते परत घेतां येणार नाहीं ; कारण त्याचा उपभोग तीन पिढ्यांपावेतों झालेला आहे " अशी हारीत स्मृति आहे, तिचा अर्थ 'उपभोगाचा हक्क आरंभापासून पोंचत नसल्यास ' असा समजावयाचा ; 'उपभोगाचा हक्क मूळींच नसतां,' असा नाहीं. पुनश्च [ हक्काचे संबंधानें ] " तकरार पडल्यास हक्क संपादणारानें त्या हक्काची शाबिती केली पाहिजे ; [ परंतु ] त्याचे पुत्रास, किंवा पौत्रास अशी शाबिती करण्याची जरूर नाहीं; कारण कीं, [ त्यांचे संबंधानें ] ताब्यास विशेष वजन आहे" अशी याबवल्क्य स्मृति ( व्य० श्लो० २८ ) आहे तिचा अर्थ, हक्काचे संपादकानें जर आपला हक्क शाबीत केला नाहीं तर तो दंडास पात्र होतो; परंतु त्याच्या पुत्रादिकांनी जर हक्काची शाबिती केली नाहीं, ह्मणजे त्यांजकडून हक्काची शाबिती करवली नाहीं तर त्यांस दंड नाहीं, इतकाच समजावयाचा ; नाशाबिती झाली तरी पुत्रपौत्रांस निवाडा मिळावा, असा या स्मृतीचा अर्थ ७२ ७४ मि० व्य० प० १४ पृ० १ वी० प० ६४पृ० २ ७५ मि० व्य० प० १४ पृ० १.