पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 नीलकंठीय. १२७ कडे असतें त्यानें राजाचे आज्ञेवरून ताम्रपटावर किंवा कापडावर राजाज्ञापत्र लिहावें. तोच स्मृतिकार ह्मणतो कीं, अशा लेखावर संमति ह्मणून स्वदस्तूरची सही राजानें करावी [ तह किंवा लढाईचे संबंधाचें काम ज्या अधिकान्याकडे असेल त्यानें ] "च- तुःसीमा व लांबीरुंदीचें परिमाण [ लिहावें ], आणि अमुक राजाचा पुत्र, मी अमुक राजा, माझी संमति आहे, असें राजानें [ त्या लेखावर ] लिहावें. " " संनिवेशं प्रमाणं च ' या प- दांचा संबंध मागें गेलेल्या वाक्याशी समजावा. राजकीय लेखांचे चार भेद वसिष्ठ सांगतो प्रथम [भेद ] ' शासनं ' ( राजाचे हुकूमपत्र ) हा समजावा; दुसरा 'जयपत्र' (ज्या प- क्षाचा जय होतो त्यास दिलेला लेख किंवा निवाडा); 'आज्ञापत्र' (त्या नांवाने दिलेला लेखी हुकूम ); आणि 'प्रज्ञापनापत्र' (विनंतीचा लेख); हे राजकीय लेखांचे चार प्रकार झाले. ताब्यांतील कनिष्ठ (मांडलिक ) राजांस, तावेदार कामगार लोकांस, प्रांताचे सुभेदारांस, ज्या लेखानें कांहीं कार्य सोपविलें जातें किंवा हुकूम केला जातो, किंवा अशाच प्रकार- चे इतर लेख यांस ' आज्ञापत्रं ' असें ह्मणतात. ऋत्विज, पुरोहित, आचार्य, व अशाच प्रतीच्या इतर मान्य पुरुषांस जो विनंतीपूर्वक लेख कांहीं कार्य करविण्यासाठीं लिहिला 'प्रज्ञापनपत्रं, असें ह्मणतात." शासन व जयपत्र यांचीं लक्षणें पूर्वी सांगितलीच आहेत. यावल्क्य (व्य ० लो० ९१ ) 66 [[दिलेला ] लेख जर देशांतरी असेल, जर 99 त्याचा बोध होत नसेल, जर तो हरवला असेल, किंवा त्यावरील अक्षरें उडाली असतील, किंवा तो चोरीस गेला असेल, तसेंच जर तो फाटला किंवा जळाला असेल, किंवा त्याचे तुकडे झाले असतील तर [ राजानें ] दुसरा लेख करवावा. नारद " मुकदम्यांतील लेख कायम असून जर तो दुसऱ्या देशांत राहिला असेल, जर तो जीर्ण होऊन गेला असेल, किंवा त्यावरील अक्षरे वाचतां येतनाशी झाली असतील, किंवा चोरीस गेला असेल, तर तो हजर करण्यासाठी मुदत द्यावी; पण ज्या मुकदम्यांत लेख कायम राहिलेला नसेल त्या मुकदम्यांत लेखावर साक्ष घालणारांच्या जवान्या घ्या- व्या. 'द्रष्टारः ' ह्मणजे लेखावर सह्या करणारे साक्षी. ११६९ 6 तसे साक्षी नसतील तर दिव्य करवावें असें पुढील कात्यायन स्मृतींत सांगितलेले आहे. “ मुकदम्यांत लेख किंवा साक्षी नसल्यास [राजानें] दिव्य करविण्याचें ठरवावें. " यावल्क्य (व्य० श्लो० ९२) "लेख न दिल्याची तकरार पडेल किंवा कांहीं संशय उत्पन्न होईल तर त्या लेखाचे खरेपणाची शाबिती [ ज्या मनुष्यानें तो लेख लिहिला होता असें ह्मणर्णे असेल ] त्याचे हातचे इतर लेखांशी तुलना वगैरे करून घ्यावी; [ तसेंच ] युक्तिसिद्धप्रमाणावरून, पक्षकारांचे समक्ष रुजुवातीअंतीं निष्पन्न हो • ६८ वी० प० ६१ पृ० २. ६९ मि० प० प० ३४ पृ० २० वी० प० ६१ पु० ३.