पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ 6 व्यवहारमयूख. आहे' असे लिहावें. [६] आपल्या नांवाचे पूर्वी आपल्या बापाचें नांव लिहून साक्षींनी सह्या कराव्या. त्या अशा, “ मी अमुक अमुक ह्यास साक्षी आहे. ' ह्या साक्षांची संख्या सम असावी [ ८७ ] ज्या मनुष्यानें तो करार लिहिला असेल त्यानें त्या कराराचे शेवटी 'मी अमुक अमुक, अमक्याचा पुत्र, म्यां उभयपक्षांचे विनंतीवरून हा करार लिहिला आहे " याप्रमाणं लिहावें. [८] ' समाः ' [ असे स्मृतीत आहे ] त्याचा अर्थ गुणांनीं व सं- ख्येचे ठिकाणी. 'असमाः ' असें पद काढतात [ त्याचा अर्थ समाः याचे उलट ]. नारद " ऋणकोस लिहितां येत नसेल तर त्याने आपली कबुलात ( संमती ) दुसऱ्याकडून लिहविण्यास मोकळीक आहे; तसेंच साक्षीस लिहितां येत नसल्यास सर्व साक्षींचे देखत आपली सही कोणाही एका साक्षीकडून करवावी. " 6 6 पूर्वी सांगितलेल्या राजकीय लेखांचे तीन भेद याज्ञवल्क्य व बृहस्पति सांगतात (याज्ञवल्क्य भ० श्लो० ३१७, ३१८, ३१९, ३२०, ) " राजानें भूमि (भूमिदान) किंवा. निबंध (राजाच्या धर्मोपदेष्ट्यांस वगैरे वर्षासन) दिल्यास त्या दानाबद्दलचा लेख [३१७] पुढें: होणाऱ्या नीतिज्ञ राजांच्या माहितीसाठी करावा. कापडाचे किंवा तांब्याचे पत्र्याचे शिरावर राजानें आपल्या नांवाची ( आपल्या विवक्षित चिन्हांची ) मुद्रा वठवून [३१८] आपल्या वंशांतील पुरुषांचीं नांवें व नांव राजानें लिहवून प्रतिग्रहाचें परिमाण ( दिलेले वस्तूचें माप, जमीन असल्यास लांबी रुंदि वगैरे ) व त्याच्या चतुःसीमा लिहवून, कायमचें हुकूमपत्र [३१९] मितीसहवर्तमान व स्वहस्ताचे सहीनिशीं द्यावें " [ ३२० ]. 'निबंध ' ह्मणजे. राजानें किंवा इतरांनीं खाणीचे उत्पन्नांतून किंवा अशाच प्रकारचे दुसरे उत्पन्नांतून दिलेला हिस्सा. ‘प्रतिग्रहः' ह्मणजे पृथ्वी वगैरे दान घेण्याचा पदार्थ त्याचें ' परिमाण' ह्मणजे लांबी, रुंदी माप वगैरे. " दानं ' ह्यणजे घर वगैरे वस्तूंची देणगी. छेदः " ह्मणजे हद्दी किंवा सीमा. तिचें ' उपवर्णनं ' ह्मणजे [ दान दिलेले वस्तू- चें] वर्णन, जसें [ ओळखण्याजोगे ] रीतीनें चतुःसीमा वगैरेचा उल्लेख. बृहस्पति तसेंच ह्मणतो “ एकादे कार्याबद्दल किंवा शौर्याबद्दल किंवा इतर कारणानें राजाची मर्जी [ कोणावर ] सुप्रसन्न झाल्यास त्यास जमीन वगैरेचें दान राजा ज्या लेखा- निशीं करून देतो त्या लेखास ' प्रसादलिखितं ' ( मेहेरबानीस्तव दिलेला लेख ) असें ह्मणतात. उभयपक्षांचा पुरावा घेऊन मुकदम्याची चौकशी करून अखेरचा ठराव केल्यावर ज्या पक्षाचा जय होतो त्या पक्षास राजा जो लेख देतो त्यास ' जपयत्रं (जयाचा लेख किंवा निवाडा ) असें ह्मणतात. " राजाचे प्रतिनिधीनें [ कधीं लेख क- रावा वगैरे ] बद्दल व्यास सांगतो “ तह किंवा लढाईसंबंधानें काम ज्या कारभाज्या- ६७ वी० प० ६० पृ० १ ६६ मि० व्य० प० ३३ पृ० २.