पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १२५ कात्यायनाने असे सांगितलेलें आहे " कोणावर [ लोकांनीं ] दोषारोप केला असून जर प्रायश्चित्तादिक करून दोषमुक्ति त्यांनी केली, तर [असें प्रायश्चित्त केल्याबद्दचे मतलबाचा] साक्षीसहित जो लेख केला जातो त्यास शुद्धिपत्र असें ह्मणतात. [ कोणावर ] दोषारोप होऊन मुख्य मुख्य मंडळींनी त्या दोषारोपाचा काय निकाल केला अशाबद्दल जो लेख होतो त्यास संधिपत्रक ( सल्ला झाल्याबद्दलचा लेख ) ह्मणावें. सीमेचे वाद सीमेचा निकाल केल्यावर त्या ठरावाचा जो लेख होतो त्याचें नांव सीमापत्रक. " " स्वतःपाशीं [ दुसऱ्याची ]. तिसऱ्याकडे पुनः गहाण ठे- " 99 दु गहाणखत ह्मणजे काय हें प्रजापति सांगतो जी वस्तु गहाण असेल ती धनकोनें तितक्याच ऐवजाबद्दल विली, तर त्या तिसऱ्या माणसास त्याने निराळें गाहाणखत करून द्यावें । या गहाणख- तास दुणें गाहाणखत ह्मणावें ] शिवाय मूळचें गहाणपत्रही द्यावें (६५) याविषयीं याश्वल्क्य ( व्य० श्लों० ९४ ) " कर्ज परत दिल्यावर लेख ( ह्मणजे रोखा वगैरे ) फाडून टाकवावा; किंवा कर्ज परत दिल्याबद्दल निराळा लेख करावा.' वर लिहिल्याप्रमाणं स्वहस्ताने करून दिलेले लेख व इतरांनी केलेले लेख यांतील भेद नारद सांगतो “लेख दोन प्रकारचेः स्वहस्तानें लिहून दिलेले, व इतरांनी केलेले; व [ अनुक्रमें ] साक्षींच्या सह्यांशिवाय, किंवा साक्षींच्या सह्यानिशीं. अशा लेखांचा पक्केपणा ( असे लेख कायदेशीर किंवा बेकायदा हा विचार) देशरिवाजावर अवलंबून राहातो. याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० ८९ ) स्वहस्ताचे लेखावर साक्षी नसले तरी तो लेख [ ज्या पुरुषाचे हातचा असेल त्याचे विरुद्ध ] प्रमाणभूत होय असें ह्मंटलेलें आहे; मात्र तो लेख कपटाने किंवा जबरीनें केलेला नसावा. ' बलं ' ह्मणजे जबरदस्ती. ' उपधिः ' लोभादिक कारणानें कपट. इतरांनी केलेले लेखांत कांहीं विशेष तोच स्मृतिकार सांगतो. ( याश्वल्क्य व्य० श्लो० ८४. ८५ ) " उभयपक्षांचे राजीखुषीनें जो करार कला जातो [ त्याबद्दल ] साक्षीसह्यानिशीं लेख करावा; व त्यावर आरंभीं धनकोचें नांव असून वर्ष, मास, पक्ष, तिथि, आणि ऋणकोधनकोंची नांवें, जाती. कुळें, विद्वत्तेचे संबंधानें त्यास कांही पदव्या मिळालेल्या असल्यास त्या, व बापांची नांवें वगैरे असावीं." " सब्रह्मचा- रिकं ' ( ह्मणजे विद्वत्तेसंबंधी पदवीसहित ) मोठेपणाचे संबंधाचे बहुचादिशाखांचा उल्लेख असलेले विशेषण 'बह्वृच ' ( ह्मणजे बह्वृच शाखाध्ययन करणारा) अथवा ' कठः ' (ह्मणजे कठशाखाध्ययन करणारा वगैरे) तोच स्मृतिकार ह्मणतो (याश्वल्क्य व्य ० श्लो० ८६-८७–८८). “ करारांतील सर्व ठराव [ त्या लेखांत ] लिहिल्यावर त्याखालीं ऋण- कोनें स्वहस्तानें सही करावी, [आणि] 'मी अमक्याचा पुत्र, वर लिहिलेले करारास माझे संमत ६५वी० प० ५९ पृ० २.