पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ व्यवहारमयूख. लेख. " बृहस्पति लेखांविषयीं सांगतो " लेखांचे तीन प्रकार सांगितलेले आहेतः राजानें लिहिलेले, विशेष ठिकाणीं लिहिलेले, आणि मनुष्यानें स्वहस्तानें लिहिलेले. यांचे पुनः पोट- भेद पुष्कळ आहेत. " वसिष्ठानें तर " लेख दोन प्रकारचेः लौकिक आणि राजकीय " या प्रकारें लेखांच्या दोन जाती ठरविलेल्या आहेत. [ या स्मृतिकारानें ] स्थलविशेषीं लि- हिलेले लेख व मनुष्यानं स्वहस्तानें लिहिलेले लेख यांतील भेद न ठेवून वर लिहिलेल्या दोन जाती ठरविलेल्या आहेत. ' लौकिकं ' यालाच ' जानपदं ' असेंही झटलेलें आहे. स्मृतिसंग्रहकर्ता ह्मणतो " लेख दोन प्रकारचे ठरविलेले आहेतः राजानें केलेले [ असतील ] ते व लोकांनी केलेले [ असतील ते ]. " बृहस्पति " लोकांनी केले- या लेखांचे भेद खातः [ ते असे ] वांटणीची फारकत, दानपत्र, खरेदीपत्र, गहाणख- त, करारपत्र, गुलामाचा दस्तऐवज, कर्जखत, व अशा प्रकारचे इतर लेख. राजाच्या आज्ञांचे तीन प्रकार. भाऊ भाऊ स्वसंतोषानें विभक्त होऊन आपसांत वांटणीबद्दल जो दस्तऐवज करतात त्यास ' वांटणीची फारकत असें ह्मणतात. जमीन देऊन [ त्या दानाचे संबंधानें ] सूर्य, चंद्र, आहेत तोपावेतों ती कायम राहावी, तिचा विच्छेद होऊं नये, व अपहार होऊं नये, अशा अर्थाचा जो लेख दिला जातो तें दानपत्र ह्मणून प्रसिद्ध आहे. घर, शेत किंवा अशासारखी दुसरी वस्तु विकत घेऊन किंमतीचा स्पष्ट उल्लेख करून खरेदीदार त्या खरेदीबद्दल दस्तऐवज घेतो त्यास खरेदीपत्र ह्मण- तात. जेव्हां कोणी स्थावर किंवा जंगम मिळकत दुसऱ्याकडे गहाण ठेवून गहाण ठेव- लेले वस्तूचा वापर करावा किंवा नाहीं या शर्तीबद्दल खुलासा त्यांत करून दस्तऐवज लिहून देतो त्या दस्तऐवजास गहाणखत ह्मणतात. गांवांतील किंवा जिल्ह्यांतील लोक एकमेकांचे राजीखुषीनें कांहीं एक कर्तव्यासाठीं नियम किंवा ठराव राजाचे कायद्यास विरुद्ध नसलेला करून त्यासंबंधाचा जो लेख करतात त्यास करारपत्र अन्नवस्त्रास मोताद झालेल्या माणसानें ' मी तुझें काम करीन' ह्मणून रानांत जो दस्तऐवज लिहून दिला असेल त्यास गुलामाचा दस्तऐवज असें ह्मणतात. व्याजानिशीं कर्जाऊ पैसा घेऊन त्या कर्जाबद्दल कर्ज घेणारा जो दस्तऐवज स्वतः करून देतो व दुसऱ्या मार्फत करवितो त्यास ज्ञात्यांनी ६५ कर्जखत ह्यटलेले आहे. " ' आदि ' ( ह्मणजे वगैरे ) शब्दानें शुद्धिपत्र वगैरे प्रकारचे लेख घ्यावयाचे. ह्मणतात. ३४ शुद्धिपत्र ( पापकर्मीपासून शुद्ध झाल्याबद्दल लेख ) व इतर लेख यांबद्दल ६४ ' धर्मार्थ' या ठिकाणी 'कामार्थ ' असा पाठ आहे. (ख). ६३ वी० प० ५९ पू० २. ६५ वी० प० ५९ पृ० २.