पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय. १२३ "" पक्षकार दिव्य करण्यास तयार असेल, तर [ राजानें ] साक्षींच्या जवान्या घेऊं नयेत. " ब्यास जर कोणी मनुष्य ह्मणेल 'हा दस्तऐवज मी केला नाहीं, त्यानें हा बनावट आहे,' तर अशा ठिकाणी दस्तऐवज एकीकडे ठेवून दिव्य देऊन त्यावरून निकाल क रावा. जेथें मनुष्यवस्ती नसेल अशा अरण्यांत, रात्रों, घरांतील एकांत ठिकाणी स अपराध केला असल्यास, किंवा ठेव नाकबूल केल्यास, तेथें दिव्याचाच पुरावा घेणे योग्य. " बृहस्पति एकाद्या दस्तऐवजांत (लेखांत ) संशय उत्पन्न होईल, तोंड-- च्या पुराव्यांत संशय येईल, व जेथें खात्रीलायक अनुमान करतां येत नाहीं, तेथें त्याचा खुलासा करण्याचा मार्ग दिव्य करणे हा होय. " 66 १२ कांहीं मुकदम्यांत साक्षी, पुरावा, किंवा दिव्ये यांतून पाहिजे तें ध्यावे अशाविषयीं तोच स्मृतिकार सांगतो " जबरीची चोरी [ किंवा अशाच जातीचे इतर मोठे गुन्हे ], मारामार, शिवीगाळ यांबद्दलच्या मुकदम्यांत, आणि जबरदस्ती केल्यापासून उद्भवलेले मु कदम्यांत साक्षीपुरावा घ्यावा किंवा दिव्य करावें ; [ दोन्ही ग्राह्य आहेत ]. क- र्जाचे मुकदम्यांत लेख किंवा साक्षी घेऊन, युक्ति प्रयुक्ति चालवून आणि असाच दुसरा प्रकार करून किंवा दिव् करवून पुरावा करवावा अर्से लोककल्याणेच्छु [ सत्पुरुषांनीं ] ठरविलेलें आहे.” ‘युक्तिलेशः ' ह्मणजे युक्ति लढवून अंशतः तर्कीनें शाबिती करणे. ‘वाचिक पारुष्य ' ह्मणजे भाषणानें अब्रू जाण्याजोगी किंवा निंदा होण्यासारखी शिवी- गाळ; जसें 'तूं ब्रह्मघातकी आहेस' वगैरे.. " शब्दांनीं ताडण्याबद्दलचे [ किंवा अब्रू घेण्याबद्दलचे ] मुकदम्यांत व जमिनीबद्दलचे तंट्यांत दिव्य करूं देऊं नये " अशी कात्यायन स्मृति आहे ती भाषणानें अब्रू घेण्याबद्दलचे लहानसहान तंट्यांचे संबंधानें आहे असे समजावें. या स्मृतींत जमिनीचा उल्लेख आहे; हे केवळ उपलक्षण समजाव-- याचें; ह्मणजे त्या शब्दानें सर्व प्रकारचे स्थावराचा संग्रह होतो अर्ते समजावें. यावि- घयीं पितामह “स्थावराचे दाव्यांत दिव्ये करावयाचीं नाहींत." हा दिव्याविषयींचा निषेध जेथें साक्षी वगैरे असतील तेथें लागू आहे, (ह्मणजे साक्षी वगैरे पुरावा नसल्यास दिव्ये करावीं ). तोच स्मृतिकार त्याच संबंधार्ने ह्मणतो. ] स्थावर मिळकतीचे ] दा- ब्यांत पक्षकारानें “साक्षी, लेख आणि भोगवटा यांचे द्वारें पुरावा करावा. तोच स्मृति- कार “ जेथें लेख नाहीं, ताबा नाही, आणि साक्षी नाहीत आणि दिव्यांचाही संभव नाहीं, तेथें राजा प्रमाणभूत. [ कारण ] तंट्यांतील सर्व संदिग्ध ठिकाणी राजानें निर्णय करावयाचा आहे. अशा प्रकरणांत अखेर निकाल करण्याचा अधिकार राजाचा, का-- रण तो सर्वांचा प्रभु होय. " 'व्यवहारमातृका:' ह्मणजे दिवाणी काम चालविण्याचे 6. रीतीविषयाँ नियम समाप्त. ६२ मि० व्य. प० ११ पृ० १ "