पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-१२२ ६० ५८ व्यवहारमयूख. आणि दुसरा [पक्षकार ] दैविक पुरावा देऊं इच्छील, तर त्या ठिकाणीं राजाने मानुष पुरा- वाच घ्यावा, दैविक घेऊं नये. पक्षकारांनी दाखल करण्यासाठी आणलेला मानुष पुरावा जरी दाव्यांतील पूर्ण विषयाचा व्यापक असा नसेल, आणि दैविक पुरावा पूर्णपणे व्यापक असेल, तरी दैविक न घेतां मानुष पुरावाच ध्यावा. वादांत जेथें साक्षी अस तील तेथें दैविक पुरावा अग्राह्य आहे; आणि लेखीपुरावा जेथे आहे तेथें दिव्ये करवूं नये किंवा साक्षीपुरावा घेऊं नये. पूग, श्रेणी, गण, आणि इतर व्यापारधंद्याचे लोक यांविषयीं जे नियम ठरविलेले आहेत त्यांसंबंधानें [ पाहिलें तरी ] त्यांनी ( पूगादिकां- fi) जो पुरावा [ घेण्याचा आहे तो ] लेखी असला पाहिजे, दिव्यें किंवा साक्ष असूं नयेत. " ज्या ठिकाणीं एकादी वस्तु देऊं केलेली असून दिलेली नसेल, तसेंच एकवार वस्तु देऊन धन्यापासून ती परत घेतली [ अशी तकरार ] असून निर्णय करणें अ- सेल" तेथें, एकाच वस्तूवर अनेक वारसा सांगत असल्यास तेथें मालकीचा निर्णय करण्यांत, विकलेली वस्तु परत घेण्याचे दाव्यांत, वस्तु विकत घेऊन [ घेणारा ] किंमत देत नसेल तेथें, [ निर्जीव वस्तु लावून ] जुवा 'खेळण्याची बाबत, व [ सजीव वस्तु ला- वून ] जुवा खेळण्याची वाचत; या बाबदींपैकी कोणत्याही बावर्दीत तकरार पडेल तेव्हां साक्षीपुरावा घ्यावा असें ठरविलेले आहे; तेथें दिव्यांनी किंवा लेखांनी पुरावा करण्याचा नाहीं. [ नवीन ] दरवाजे करण्याचे संबंधानें किंवा दरवाज्याचे उपभोगाच्या किंवा रस्त्याचे उपभोगाच्या मालकीबद्दल तंटा असेल तेथें, तसेंच पाण्याचे प्रवाहासंबंधाचे [ हक्काविषयींचे] किंवा अशा प्रकारचे इतर तंट्यांत उपभोगाचा मात्र विचार करावा; तेथें लेख किंवा साक्षी नकोत. " . कांहीं बाबतींत दिव्यांची विशेष योग्यता आहे असें बृहस्पति सांगतो " कोणी विश्वासघातानें हिरे, माणकें, मोत्यें, नगदी पैसा चोरल्यास, कोणी ठेव चोरून नेल्यास, कोणी दुसन्यास घायाळ ( शारीर दुखापत ) केल्यास, आणि एकानें दुसऱ्याचे स्त्रीशीं संभोग केल्यास अशा अपराध्यांकडून शपथरूप दिव्य करवून त्यांची चौकशी केली पाहिजे. महापातकें केल्याबद्दलचे मुकदम्यांत साक्षी हजर असले तरी, जर ५८ मि० व्य ० प० ११ पृ० १ बी० प० पृ० १. ५९ बी० प० ३५ पृ० २. ६१ ‘ स्वामिनः ' (धन्याच्या) या ठिकाणीं 'स्वामिना' (धन्यानें) असाही पाठभेद आहे (ङ) (च), ६१ दत्वाऽदत्तेद्दत्तमिति प्रतिश्रुत्याऽनर्पिते । तथादत्ते दत्त्वा पुनराच्छिद्यगृहीते || स्वामिनां निर्णय सति एतत्स्वामिकमेतदिति निश्वये सतीति ।। क्वचित्पुस्तकेऽधिकं दृश्यते. (छ) दत्वाऽदसे तथाऽदत्ते इत्यत्र दत्ताsदते च भृत्यानामिति मिताक्षरायां । दत्ताऽ दत्तेषु भृत्यानामिति वीरमित्रोदये (मि० व्य० प० १, पृ० १; वी० प० ३५ पृ० २ ). याप्रमाणे निरनिराळे ग्रंथांत कांहीं पाठभेद असल्याने अर्थात् थोडा त फरक पडतो, परंतु सांप्रतविषयाचे नियमांत कांहीं कमीजास्ती होत नाहीं..