पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १२१ काच दंड राजास देववणार नाहीं तो, व गैरमाहित ह्यांपैकी प्रत्येक पुरुष जामीन राहा - ore नालायक आहे. " 'निरुद्ध' ह्मणजे बिडी घातलेला वगैरे. 'संशयस्थ ' ह्मणजे व्यसनी. 'रिक्थी' ह्मणजे पुत्र, नातु वगैरे ज्यांस दाय मिळण्याची योग्यता आहे.' 'रिक्त: ' ह्मणजे दरिद्री. ' अन्यत्र वासितः ' देशपार घालवून दिलेला. याश- वल्क्य (व्य० श्लो० ५२) “ विभक्त झालेले नाहीत तोपावेतों भावाभावांत, नवराबाय- कोमध्ये, व पिता आणि पुत्र यांचे दरम्यान आपसांत जामीनकी, देवघेव, व एकमेकां- बद्दल साक्ष देणें हे संबंध होऊं शकत नाहींत असें ह्यटलेले आहे. " (१६) जामीन न दिल्यास काय करावें हें कात्यायन सांगतो होणाऱ्या फैसल्याची अमलवारी करून देण्यास लायक असा जामीन वादीनें हजर न केल्यास, त्यास नजरकैदेत ठेवावें, आणि संध्याकाळीं त्यावरील रखवालदारांबद्दल रोजमुरा त्याजकडून देववावा. " पुनः तोच स्मृतिकार ह्मणतो " द्विजाला जामीन देण्याचे सामर्थ्य नसल्यास रखवालदारांनी त्यावर फक्त नजर ठेवावी; शूद्र आणि इतर लोकांस, त्यांस जामीन देण्याचें सामर्थ्य न- .सल्यास, बिडी घालावी." 66 " जो ज्याचा दावा देववितां किंवा दाखल कारता येणार नाहीं अंशा वादीविषयी ना- रद सांगतो " जो वादी आपला पहिला दावा सोडून दुसरा दावा पुनः आणतो त्यास त्याच्या दावे फिरविण्यामुळे तो हीनवादी (किंवा खोटा पक्षकार ) असें जाणावें. " सदोषपक्षकाराविषयीं याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १३-१४ - ११ ) मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, अशीं स्थलांतरें करीत जातो, आपले ओठ वारंवार चाटतो, ज्याचे कपाळाला घाम सुटतो, व वारंवार ज्याचा चेहेरा उतरतो, [ बोलते वेळेस ] घसा कोरडा पडून अडखळत अडखळत जो बोलतो व विसंगत भाषण करतो, दुसरा काय बोलतो- त्याकडे, किंवा दुसऱ्या पुरुषाकडे जो पहात नाहीं व आप- ले आपण ओठ चावतो, जो आपल्या मानसिक, भाषणसंबंधी, किंवा शारीर कृत्यांनी अ- स्वस्थ दर्शेत पडतो, त्यास, मग तो वादी असो किंवा [जबानी देणारा ] साक्षी असो, दुष्ट (सदोष ) पुरुष असें समजलें पाहिजे." 'सृक्किणी ' ह्मणजे ओठांचे पुढील भाग. पुरावा. आता पुराव्याच्या स्वरूपाविषयीं. याज्ञवल्क्य (व्य० श्लो० २२) “ लेख, भोगवटा, आणि साक्षी यांस पुरावा असें ठरविलेले आहे. यांपैकी कोणताही पुरावा नसल्यास त्याच्या मोबदला दिव्यें करण्याचे ठरविलेले आहे. "५७ याविषयीं कात्याय- नाचेंही असेंच ह्मणणें आहे " एक [ पक्षकार ] जर मानुष पुरावा दाखल करील ५६ डी० प० १८ पृ० २. १६ ५७ वीं ० प० ३५ पृ. २.