पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. ११९ यांचा या ठिकाणी संकर आहे तरी दाव्यांतील पूर्ण विषयास धरून जबाब आहे. या जबाबांत नाकबूली अजून विशेष अपवाद आहे. या दाव्यांत पुराव्याचा बोजा प्रति- वादीवर आहे, वादीवर नौहीं, कारण हारीत ह्मणतो की “ जबाबांत नाकबूली आणि विशेष अपवाद असला तरी त्यांतही विशेष अपवादाचा मात्र विचार करण्याचा आहे ”. त्याचप्रमाणे, नाकबूली व पूर्वी मिळालेला फैसला असे, आणि विशेष अप- वाद व पूर्वी मिळालेला फैसला असे, दाव्यांत जबाव असल्यास ते जबाब पोकळ असे समजले जाणार नाहींत ; मात्र असे जवाब दाव्यांतील पूर्ण विषयास धरून असावे. या दोन्ही प्रकारच्या दाव्यांत पुराव्याचा बोजा प्रतिवादीवरच पडतो. दोन्ही पक्षांवर पुराव्याची जबाबदारी पडेल असा एकही विषय नाहीं. [ या विषयावर ] इतकें लिहून [आ] पुरें करतों. 97 जबाब दाखल केल्यानंतर पुराव्याचा अनुक्रम कसा असावा याबद्दल याशव. ल्क्य (व्य० श्लो० ७ - ८ ) नंतर जे मागणें असेल त्याच्या बळकटीसाठीं पु- रावा देणें तो वादीनें तत्काल [ सभासदांकडून ] लिहून घेववावा. " खात्रीलायक पुरावा देववेल तर फैसल्ला मिळेल. [ तसा पुरावा ] न झाल्यास त्याचा दावा बुडेल. हा प्रकार जेथें नाकबूलीचा जबाब असेल त्यासंबंधाने समजावयाचा. दुसऱ्या प्रकारचा जवाब असल्यास पुराव्याचा बोजा प्रतिवादीवरच पडतो. याविषयीं हारीत “पूर्वी मि- ळालेला फैसल्ला व विशेष अपवाद असा जवाब असल्यास तेथें प्रतिवादीनं पुरावा करा- वा. नाकबूलीचे जबाबांत वादीनें [ पुरावा करावा ]. कबूल जबाब असल्यास तेथें पुराव्याची जरूरी नाहीं. " ५२ 64 आहे. " कायदेशीर काम चालविण्याचे चार भाग याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो०८) हा व्यवहार ( न्याय • करण्याची रीति ) न्यायाचे कामांत चार भागांचा दर्शविलेला हे चार भाग एका स्मृतीत सांगितलेले आहेत. “ फिर्याद अर्ज, जबाब, पुरावा, आणि ठराव याप्रमाणे अनुक्रमानें त्याचे चार विभाग ठरविले आहेत; ह्मणून त्यास चतुष्पाद् [ चार भागांचा ] ह्यटलेले आहे." 4319 परंतु जेथें कबूलजबाबाशिवाय इतर प्रकारचा जबाब असेल त्यासंबंधानें हा वरील प्रकार समजावयाचा ; कारण जेथें कबूली जबाब असेल तेथें [ १ फिर्याद २ जवाब असे ] दोनच भाग असतात असें बृहस्पतीनें सांगितलेले आहे. नाकबूली आणि विशेष अपवाद ज्यांत असतो तो व्यवहार चतुष्पाद् ; परंतु कबूलजवाब ज्यांत 66 ५१ ‘नार्थिनः ' (वादीवर नाहीं) या ठिकाणीं 'नार्थिनोपि' असाही पाठ आहे (क) (ख) (ग) (घ). ५२ मि० व्य० प० ६ पृ० १ ५३ मि० व्य ० १ ६ पृ० २ ५४ ‘संप्रातपत्तोर्द्वपात्वात्' या ठिकाणी ' संप्रतिपत्तौद्वि' असाही पाठ आहे (च ).