पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ 64 व्यवहारमयूख. केला पाहिजे किंवा ज्यांचे समक्ष तो फैसला झाला असेल त्यांचे साक्षीनें तसा पुरावा केला पाहिजे. पुनः विशेष अपवादाचे तकरारींत साक्षीदार किंवा कागदपत्र वगैरे हजर करून पुरावा केला पाहिजे, ह्मणून जेथें विशेष अपवाद आणि पूर्वी झालेला फैसला अशा तक- रारींचें मिश्रण असेल तेथें कायद्याशीं विरोध येतो. तीन किंवा चार प्रकारच्या तक्रारींचा जेथें मिलाफ होईल तेथेही असेच समजावयाचे. अशा अनेक मिश्र प्रकारांच्या तक्रारी एकदम केल्यानें मात्र दिलेला जवाब गैरकायदा होतो; पण एका पाठीमागून एक याप्र- मार्णे तकरारी चालविल्यास अशा प्रकारचे जबाब कायदेशीर होतात. वादी, प्रतिवादी, आणि सभासद यांच्या इच्छेप्रमाणें तकरारींचा अनुक्रम राहतो. हारीत असेंच ह्मणतो जर नाकबुलीची तकरार व विशेष अपवाद अशा दोन्ही प्रकारच्या जबाबांचा संकर झाला असून [ शिवाय ] कबूलजबाबाचा दुसऱ्या एकाद्या तक्रारीशी योग होईल तर त्यांपैकी कोणता जबाब ग्राह्य आहे ? अशा प्रसंग जो अत्यंत महत्वाचा किंवा ज्यापासून पुरावा होण्यांचा उपयोग होईल त्या जबावास अमिश्र जबाब असे ह्मणावें. ह्याशिवाय इतर प्रकारचा जवाव असेल [त्यास मिश्र जबाव ह्मणावें ],' 'त्यास मिश्र जबाव ह्मणांवें ' इतक्या शब्दांचा मुळांत संक्षेप आहे, याचा अर्थ असा. सोने आणि कपडे मागण्याच्या दाव्यांत (जर अशी तक्रार केली कीं,) सोने घेतलेले नव्हतें, व कपडे घेतलेले होते परंतु ते परत केले वगैरे, तर प्रथम सोन्याचे बाबर्दीत काम चालवावें आणि कपड्यांबद्दल नंतर चाल- वा. नाकबूली आणि पूर्वी मिळालेला फैसला अशा जबाबांचा संकर होईल तेथें व विशेष अपवाद आणि पूर्वी मिळालेला फैसला या प्रकारचे जबाबांचे संकराचे ठिकाणी हाच नियम अनुसरावा; ह्मणून त्या ( सोनें आणि कपड्यांबद्दलच्या ) दाव्यांत जर अशी तकरार अ- सेल कीं, सोनें घेतलेलें होतें, परंतु कपडे घेतलेले नव्हते, किंवा घेतलेले असून परत केले होते; अथवा कपड्यांविषयीं प्रतिवादी जर अशी तकरार घेईल की, 'मी हा मुकदमा पूर्वी जिंकला आहे, तर त्या प्रसंगी कपड्यांचे संबंधाने मात्र पुढे काम चालवावें, सोन्या- बद्दल चालवू नये, कारण जरी सोनें विशेष मूल्यवान् आहे तरी [ त्याबद्दल कबूलजबाब असल्यामुळे] त्याबद्दल पुरावा करण्याची जरूरच नाहीं. जेथें कोणी अशी फिर्याद करील की, 'ही माझी गाय आहे, अमुक दिवशीं ही नाहींशी झाली पण या मनुष्याचे घरांत ही गाय आज [ मी ] पाहिली', आणि अशा फिर्यादीस जर प्रतिवादी जबाब देईल की, ' फिर्याद खोटी आहे; ती [ गाय फिर्यादीत ] दर्शविलेले वेळाचे पूर्वीपासून माझे घरीं आहे' तर हा जबाब पोकळ समजावयाचा नाहीं, कारण जरी नाकबूली आणि विशेष अपवाद ५० ( चे ) (छ)