पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दावा जबाब ह्मणतात. नीलकंठीय. ११७ 'पूर्वी झालेले दाव्याची तकरार सांगणे' याचा अर्थ कात्यायन सांगतो " एक वेळ कायद्यानें पराजित झालेला असून तो पुनः फिर्याद करील तर 'पूर्वी तुझा पराजय झालेला आहे,' असा त्यास जबाव द्यावा. यास "पूर्वी झालेल्या दाव्याची तक- रार" दाखविणें असें ह्मणतात. ४७ उत्तर याप्रमाणें दाव्यास देण्याचे [ योग्य ] जत्रावांचीं लक्षणें आहेत ह्मणून ज्या जत्रा - बांत हीं लक्षणें नाहींत ते जबाब खोटे असे उघड होत आहे; तरी त्यांचे स्वरूपांचें वर्णन दुसऱ्या एका स्मृतीत असें केलेले आहे ! जो संशयित' मुद्यास धरून नाहीं, फारच सं- क्षिप्त, फार सविस्तर, किंवा दाव्यांतील कांहीं हिश्शाचें मात्र ज्यांत उत्तर असेल, तो जबाब नव्हे; जो जवाब मुद्देसुद नव्हे, अपुरा, गूढ अर्थाचा, जें स्पष्ट भाषेनें लिहिलेले नाहीं, निराळा खुलासा मिळाल्यावांचून ज्याचा अर्थ होऊं शकत नाहीं, आणि ज्यांत hi हाशील नाहीं त्या जबाबापासून फलासोद्ध होणार नाहीं. कात्यायनाचें वचन याविषयीं असेंच आहे “ दाव्यांतील बाबदींपैकी एकीचा कबूलजबाब देईल, दुसरी- बद्दल विशेष अपवादाची तकरार सांगेल, आणि तिसरीची नाकबूली करील तर हैं मिश्रण झाल्यामुळे जबाब समजला जाणार नाहीं. " यास कां जबाब समजूं नये अशा बद्दल तोच स्मृतिकार सांगतो “ एकाच मुकदम्यांत पुराव्याचा बोजा दोन्ही पक्षकारांवर राहूं शकणार नाहीं, किंवा दोघांसही फैसल्ला मिळू शकणार नाहीं, किंवा एकाच पुराव्यांत दोन [ परस्परांशीं उलट ] जवाब देतां येत नाहींत. १४८ याचा अर्थ असा कीं, नाकबूली आणि विशेष अपवाद या जातींचे जबाबांचे मिश्रणांत पुरावा दोन्ही पक्षांकडून झाला पाहिजे, कारण नारद असें ह्मणतो की " जेथें नाकबूलीचा जबाब असेल तेथें पुराव्याचा बोजा वादीवर; व विशेष अपवादाचा जबाब असेल तेथें प्रतिवादीवर असतो " ४९ ह्मणून एकच मुकदम्यांत पुराव्याची जबाबदारी दोन्ही पक्षांवर राहिल्यामुळे एकमेकांविरुद्ध एकमेकांनी पुरावा करावा असें प्राप्त होतें हैं विरुद्ध आहे. तसेंच जेथें विशेष अपवाद व पूर्वी झालेला फैसला अशा दोन्ही प्रकारच्या जाबांचा जोड होईल तेथें दुप्पट पुरावा करण्याचा बोजा प्रतिवादीवरच राहतो; कारण व्यासाचें वचन आहे की “ जेथें पूर्वी झालेला फैसल्ला व विशेष अपवाद असे जबाब असतील तेथें प्रतिवादीनेंच पुरावा दिला पाहिजे ”. आतां “ पूर्वी झालेल्या फैसल्याबद्दलचा जबाब असल्यास तेथें फैसल्ला दाखवून किंवा न्यायाधीशाचे किंवा अशा प्रकारचे दुसऱ्या द्वाराने पुरावा करावा" असें त्याच स्मृति- काराचे वचन आहे ह्मणून पूर्वी झालेल्या फैसल्याबद्दलचे तकरारीत पुराव्यासाठीं फैसला हजर ४६ बी. प० २५ पृ० २ मि० व्य० प० ४ प. ४१०२. ४८ मि० व्य० प० ५ पृ० १. पृ० २ ४९ वी० प० ४७ वी० प २६ पृ० १, मि० व्य० २९ पृ० १ मि० व्य० प० ५ पृ० २