पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ व्यवहारमयूख. मोठ्या गांवांतील मुख्य मुख्य रहिवाशांविरुद्ध असेल, ते फिर्यादीचे सर्व विषय दाखल कर- ण्यालायक नाहीत असें धरलेले आहे. " एकाहून ज्यास्ती [ खोट्या ] बाबती [ वादीचे पुरशिशीत किंवा फिर्यादींत अ- सल्या तरी ] तेवढ्यानें फिर्याद खोटी होत नाही. खाली हिहिलेले कात्यायनस्मृतीशी विरोध येईल 66 कारण खोटी होते असें समजल्यास " खरे काय आहे हें शोधून का- ढार्वे अशी ज्या राजाची इच्छा असेल त्याने ज्या फिर्यादीत कायदेशीर बऱ्याच बाबती असतील अशीही फिर्याद दाखल करावी. " 'ज्या फिर्यादींत अनेक बाबती किंवा हक्क असतील ती फिर्याद चालत नाहीं " असें वचन आहे, त्याचा अर्थ असा समजा- वयाचा कीं, त्या सर्व बाबती किंवा हक्क हे एकदम चालत नाहींत, परंतु एकामागून दुसरा असे चालतात. 66 फिर्यादअर्ज याप्रमाणे तयार झाल्यानंतर पुढील तजविजी याचवल्क्य सांगतो [ व्य० लो० ७ ] तकरार किंवा फिर्याद काय हे त्यास समजल्यानंतर प्रतिवादीनें दिलेला जबाब वादीचे समक्ष लिहून घ्यावी. " प्रतिवादीचा जबाब कसा असावा है नारद सांगतो “फिर्यादीतील मुद्यांस धरून व थोड्यांत असून सुयुक्तिक, मुग्ध नसून सुसंगत, व खुलासा करून घेण्याची जरूर न पडतां सहज समजण्याजोगें जें [ वाक्य ] असेल त्यास उत्तर किंवा जबाब ह्मणावा असें कायद्यांच्या जाणत्यांनी सांगितलेले आहे. " जबाबाचे चार प्रकार कात्यायन सांगतो " जबाबाचे चार प्रकार आहेत. ते असे: नाकबूली, कबूली, विशेष कारण दाखविणें, किंवा पूर्वी झालेल्या दाव्याची तकरार दाखविणें. " नाकबूलीचा जबाब ह्मणजे काय हें तोच स्मृतिकार सांगतो " दाव्यांत मागितलेले आपण देणें नाहीं असें जर प्रतिवादी ह्मणेल तर त्यास कायद्यांत नाकबूली असें समज- लेलें औहे. ” नाकबूलीचेही चार प्रकार तोच स्मृतिकार सांगतो १ हें खोटें आहे; २. हें मला माहीत नाहीं; ३ तेव्हां मी हजर नव्हतों; व ४ त्या वेळेस माझा जन्म झालेला नव्हता, याप्रमाणें नाकबूलीचे जबाबाचे चार प्रकार आहेत. कबूलीचे जबाबाचें स्व- रूप दुसऱ्या एका स्मृतीत सांगितलेले आहे " दाव्यांतील मागणी कबूल करणें हा क- बूल जबाबाचा प्रकार होय." विशेषकारण किंवा अपवाद याचे स्वरूप नारद सां- गतो " वादीनें लेखी अर्जांत केलेली मागणी कबूल करून प्रतिवादी जर एकाद्या विशेष तकरारीचें कारण दाखवील तर या जबाबास कारणोत्तर किंवा विशेष अपवा- ४१ वि० प० २२ पृ०.२. ४२ मि० व्य० प० ४ पृ९१. ४३ बी० प० २३ पृ० १, मि० व्य० प० ४ पृ० २. प० ४ पृ० २. ४५ वी० ८० २४ पृ० १, मि० व्य० प० ४ पृ० २. वा० प० २२ पृ० २. ४४ बी० प० २३ पृ०.२, मि० व्य०