पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. ११५ सांगितलेले आहे. 61 स्थावर मिळकतीचे दाव्यांत पुढे लिहिलेल्या दहा बाबी लिहाव्या. देश, गांव, ठिकाण, जाति, [ वादिप्रतिवादींचीं ] नांवें, शेजारच्यांचीं नांवें, शेताचे लांबी- रुंदीचे परिमाण, व त्याचें नांव, [वादी आणि प्रतिवादी यांचे] बाप, आजे, पणजे यांची- नांवें, आणि पूर्वीच्या राजांचें वर्णन. 99 कात्यायन "वादीची तकरार ( जबानी ) जशी त्याने सांगितली असेल तशीचे- ती प्राविका ( न्यायाधीशानें खडूनें फळ्यावर ) लिहून घेववावी. तींत कमजास्त करणें असल्यास तें करून नंतर कागदावर लिहवावी. " [वादीची तकरार किंवा जवानी ] कमजास्त करून खरी करून घेण्याची मुदत किती वेळ आहे हें नारद सांगतो “वादीनें लिहून दिलेले जबानीचें [ पुरशिशीचें ] उत्तर घेण्यापूर्वी ती पुरशीस दुरुस्त करण्यास न्यायाधिशास अधिकार आहे. [ कारण ] उत्तरानें प्रतिबंधित झाल्यावर पुरशिशीची दुरुस्ती बंद झाली पाहिजे. जपावेतों वा- दीचे फिर्याद अर्जास प्रतिवादीने उत्तर दिलेले नाही तोपावेतों फिर्यादींत में अधिक दाखल करण्याची वादीची इच्छा असेल तें दाखल करण्यास हरकत नाहीं. " यांविरुद्ध ज्यांत मजकूर ( मागणी समजल्या पाहिजेत; तरी त्यां- " जी फिर्याद असंभाव्य, जींत जीस कारणच नाहीं, जिची शाविती योग्य रीतीचे फिर्यादीचीं हीं लक्षणें होत; वगैरे) असेल त्या फिर्यादी उघड अयोग्य विषय एका स्मृतीत याप्रमाणे सांगितलेले आहे नुकसानी दर्शविलेली नसेल, जींत अर्थ नाहीं, करण्याचा असंभव व जी [ साधारणनियमा ] विरुद्ध वगैरे असेल अशी खोटी फिर्याद [ राजानें घेऊं नये. ]” ' अप्रसिद्धं ' असें स्मृतींत आहे त्याचा अर्थ असंभाव्य. जसें माझें आकाशपुष्प चोरून नेलें ' ' निराबाधं ' ह्मणजे ज्यांत नुकसान दर्शविलेलें नाहीं. जसें 'माझ्या दिव्याच्या उजेडानें तो आपले काम करतो' ' निरर्थम् ' ह्मणजे 'जीत अर्थ माही. ' जसे 'माझी क च ट त प हीं अक्षरें चोरून नेली' 'निष्प्रयोजनं' ह्मणजे जीस कारण नाहीं. जसें 'माझा शेजारी चांगले स्वरानें अध्ययन करतो; ' ' असाध्यं ' ह्मणजे जिची शाबिती करण्याचा असंभव. जसें 'मजकडे पाहून भिवया फिरवून हा मला हंसला. " ' विरुद्धं' ह्मणजे सामान्य नियमाविरुद्ध. जसें मुक्याने मला शिव्या दिल्या अथवा देश किंवा शहर यांतील चालीरीतींशी, पुढील स्मृतीत सांगितलेल्या प्रकारची. विरुद्ध असेल ती. " [ फिर्यादीचा ] जो विषय राजाने प्रतिबंधित केलेला असेल, जो नगरवासी लोकांस किंवा देशाचे विरुद्ध असेल, तसेंच जो अमात्यांच्या विरुद्ध असेल [ किंवा व्यापाऱ्यांचे हिताविरुद्ध असेल ]; त्याचप्रमाणे जो शहरांतील किंवा ३९ वीं ० प० २२ पृ० १. ४० ही कात्यायनस्मृति आहे (वी० प० २० पृ० २ ).