पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

46 ११४ व्यवहारमयूख. कांहीं मुकदम्यांत मुखत्यार घेऊंच नये असें त्याच स्मृतिकाराचे ह्मणणे आहे. 'ब्राह्मणाचा वध केल्याचे मुकदम्यांत, मद्यपान, चोरी, गुरुत्रीशीं गमन, मनुष्यवध, दुसऱ्याचे स्त्रीस स्पर्श केल्याचे मुकदम्यांत; तसेंच अभक्ष्य वस्तु खाणे, अविवाहित स्त्रीला फितवून नेणें व तिला भ्रष्ट करणें, कठोर भाषण व कृत्यें, विश्वासघात आणि राजद्रोह, या मुकंदम्यांत प्रतिनिधि ( मोबदला मनुष्य, मुखत्यार वगैरे ) घेऊं नये. असें कृत्य करणा- 'रानेच जातीने हजर होऊन त्याच जबाब दिला पाहिजे. " [ चोरीच्या मुकदम्यांत ] प्रतिनिधि घेतला जाऊंच नये, ह्मणून निषेधास विशेष जोर आणण्यासाठी वरील वचनांत ' स्तेये ' स्तेये ' अशी द्विरुक्ति आहे. या वच- नांत 'प्रतिवादी' असें पद आहे त्याचा अर्थ ' मुखत्यार - 99 9 प्रतिवादीस हजर केल्यानंतर वादीनें काय करावे याविषयीं याज्ञवल्क्य सांगतो (व्य० श्लो० ६ ) " वादी जशी तकरीरं सांगेल तशी प्रतिवादीचे समक्ष लिहून घ्यावी; [आणि] या लेखावर वर्ष, महिना, पंधरवडा व मिति लिहून नांव जात वगैरेचा उल्लेख करावा. दुसऱ्या एका स्मृतींत असें सांगितलें आहे [ पुढे लिहिल्याप्रमाणें ] “ज्यांत मजकूर असेल त्यास फिर्याद अर्ज असें ह्यटलेले आहे ज्यांत अर्थ (फिर्यादीचें कारण ) असेल, धर्मानें युक्त, थोडक्यांत परंतु खुलासेवार फिर्यादीचा मुद्दा दर्शविला असेल, ज्याचा अर्थ लवकर समजला जातो, ह्मणजे जें स्पष्ट भाषेनें लिहिलेलें असेल, जें लाक्षणिक भाषेनें लिहिलेले नसेल, मूळ दाव्याशीं जें सुसंगत असेल, जें संभवनीय असेल, विसंगत नसेल, निश्चित असेल, शाबिती होण्याजोगे असेल, थोडक्यांत लिहिलेलें असेल, ज्यांत सर्व दावा स्पष्टपणे मागितला असेल, देश- कालास अनुरून जें सुसंगत असेल, ज्यांत वर्ष, ऋतु, महिना, पंधरवडा, दिवस, देश, प्रांत, गांव, घर, दाव्यांतील मागणें, जातीचें नांव, मनुष्याचें वर्णन, व वय, दाव्यांतील मागणीचें वजन, माप, वगैरे, वादी व प्रतिवादींचीं नांवें, त्यांचे निरनि- राळे पूर्वजांचा व त्यांचे निरनिराळे राजांचा ज्यांत उल्लेख केलेला असेल; व [ कारण घडतांच फिर्याद केली नसल्यास तेथपावेतों ] कां फिर्याद केली नाहीं ह्याचे कारण, फिर्यादीचें जें नुकसान झालेले असेल तेंव [ दाव्यांतील ] मागणीच्या वस्तूचा आरंभी- चा देणारा कोण व घेणारा कोण हैं ज्यांत लिहिलेले असेल ". वर्ष वगैरे लिहि- ण्याचें वर सांगितलेलें आहे त्याचा उपयोग काय हैं ' गहाणं वगैरे ' या प्रकरणांत दर्श- विलें जाईल. देश वगैरे लिहिण्याचा कांहीं प्रसंगी काय उपयोग आहे हैं एका स्मृत ३८ ३६ ' तद्धि' या ठिकाणीं 'तुवि' असाही पाठ आहे (क) (ख) (ङ). ३७ (दा) (घ) (च). ३८ वी० प० १९ पृ० २ हा एका स्मृतींबील उतारा झगून दिलेला आहे. हीं वचनें स्मृतिसंग्रह अणून ग्रंथ आहे त्यांतील आहेत. •