पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीष. ११३ २९ [ शनैः शनैः ] यांतील दुसन्या 'शनैः' या ठिकाणी 'यानैः " ( गाडींत वगैरे बसवून ) अ- साही कोठें पाठ आहे. 3० बोलावर्णे झाले असून जो हजर होणार नाहीं तो शिक्षेस पात्र होतो. याविषयीं बृहस्पति "ज्यांस बंधु व कुटुंब आहे अशा पुरुषास बोलावणे केले असून गर्वामुळे नर तो हजर होणार नाहीं तर मुकदम्यांतील विषयाच्या स्वरूपाप्रमाणे [ राजानें] त्यास शिक्षा ठरवावी". 3. मुकदम्यांतील विषयाचे महत्वाप्रमाणे निरनिराळ्या शिक्षा कात्यायन 'मुकदम्यांतील तकरार क्षुल्लक असल्यास पन्नास [ पण ] दंड करावा; मध्यम प्रकारची तकरार असल्यास दंड शंभरांचेपेक्षा कमी असूं नये; पण मोठ्या मह- त्वाच्या तकरारीत पांचशांखालीं असूं नये”. 66 सांगतो. ज्यास बोलावर्णे केलें तो हजर झाल्यावर काय करावें याविषय पितामह सांगतो “ प्रतिवादीस वादीसहवर्तमान राजसभेपुढे उभे करावें;" स्मृतीत 'वादिना ' असे तृती- यांत पद आहे; ही सहार्थी तृतीया समजावी.. ३२ 99 6 कात्यायन " तेथे” (ह्मणजे समेत ) वादीने [ प्रथम ] आपली हकीकत सां- गावी त्यावर प्रतिवादीनें आपला जबाब सांगावा; समासदांनी नंतर बोलावें; आणि त्या- 'नंतर न्यायाधीशानें. बृहस्पति मी पहिल्यानें' "'मी पहिल्यानें ' असें प्र- त्येक तोंडाने ओरडत जर वादी व प्रतिवादी हे एकदम सभेपुढे येतील तर त्यांचे वर्णाचे अनुक्रमानें त्यांची तकरार दाखल करावी, किंवा काय नुकसान झाले आहे याची चौकशी करून नंतर दाखल करावी. " “ ज्याची बुद्धि पोक्त नाहीं असा मनुष्य; किंवा मूर्ख, किंवा वेडा, किंवा वृद्ध, किंवा स्त्रिया, किंवा अल्पवयस्क, किंवा रोगग्रस्त, यांचे मोबदला तकरार करणे किंवा तक- रारीचा जबाब देणें तो अशा मनुष्यांच्या संबंध्याने किंवा योग्य रीतीनें नेमलेल्या मुख- त्यारानें” द्याँवो " नारद. " मुखत्यार ( हजर झालेला मनुष्य ) वादीनें नेमलेला असो किंवा प्रतिवादीनें नेमलेला असो, त्यास जय किंवा पराजय प्राप्त होईल तो नेमणारे प- क्षकाराचा समजावा. "" भाऊ, बाप, पुत्र किंवा चाकर हे शिवाय करून जो पुरुष इतरांसाठी मुकदमा चालवितो तो, त्या मुकदम्यांत खोटें बोलेल तर शिक्षेस पात्र होतो " . अर्से कात्यायनाचें वचन आहे ते, जे मनुष्य योग्य रीतीनें मुखत्यार नेमलेले नसतील त्यांचे संबंधानें आहे असे समजावें. २९ यानैराव्हापये 'न्नृपः' ( वाहनें पाठवून बोलवावें ) असा पाठ वीरमित्रोदयांत आहे. ३० वी० प० १७ पृ० १. ३१ ततो (नंतर) (ख) (ग). ३२ वी० प० १८ पृ० १. ३३ (च) (ख) (ग). ३४ वी० प० १९ पु० १. ३५ व्हयेत् या ठिकाणीं वहेतू असा पाठभेद आहे (घ) (ङ) (च).