पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ व्यवहार मयूख. २७ नाहीं. " कांहीं विशेष स्थितीत आसेध ( कायदेशीर ) प्रतिबंध उल्लंघिल्यास त्याबद्दल शिक्षा नाहीं असें नारद सांगतो " नदी उतरून पलीकडे जात असतां, किंवा अग-' म्य रस्त्यानें ( रानावनांतील मार्गानें ) जात असतां, वाईट ठिकाणी किंवा संकटावस्थेत असतां, किंवा अशाच प्रकारचे कोणत्याही स्थितीत असतां ज्यास प्रतिबंध केला असेल तो जर त्यांतून पळून जाईल तर तो अपराधी होत नाहीं. " ज्यांस प्रतिबंधांत ठेवूं नये अशांस प्रतिबंधांत ठेवल्यास ठेवणारास शिक्षा कात्यायन सांगतो " जो प्रतिबंधास पात्र नाहीं अशास कोणी प्रतिबंधांत ठेवील तर ठेवणारास राजानें शिक्षा करावी असा नियम आहे. " (२७) कोणास प्रतिबंधांत ठेवूं नये हें तोच ( कात्यायन ) सांगतो “जे पुरुष वृक्षावर किंवा डोंगरावर चढलेले असतील, हत्तीवर, घोड्यावर, गाडीत किंवा बोटींत बसलेले असतील [ते सर्व] भयंकर ठिकाणी बसलेले [ असे समजावयाचें] ह्मणून दाव्याच्या चौकशीचें काम जे खऱ्या रीतीनें करीत असतील त्यांनी (२७) अशा पुरुषांस प्रतिबंधांत घालूं नये. तसेंच रोगाने त्रस्त झालेले, संकट अवस्थेत पडलेले, आणि यजमान ( यज्ञयागांतील मुख्यकर्ता त्या कर्मात असतां ) यांस प्रतिबंधांत घालूं नये. " ( २८ ) [ बोलावणें करण्याचे बाबदत पुढे लिहिलेले नियम नारद सांगतो ] “खालीं सांगितलेल्यांस राजानें बोलावणें करूं नये :- अशक्त, वयांत न आलेले, वृद्ध, एकाद्या भयंकर स्थळीं असलेले, आणि धर्मकृत्यांत - निमग्न असलेले ; [ तसेंच ] [ बोलावणें केलें असतां ] ज्यांचें नुकसान होईल ते, मनोरथाचा भंग झाल्यानें ज्यांस व्यथा झालेली अ- सेल ते, राजाचें कार्य करणारे तें काम करीत असतां, किंवा धार्मिक उत्सवाचे कार्यात असतील ते, मद्यपानानें उन्मत्त झालेले, भूतबाधा झालेले, वेडगळ मनुष्य, दुःखग्रस्त झालेले, व पराधीन (शिष्य किंवा चाकर वगैरे ) ; जिला साहाय्यकर्ता कोणी संबंधी नाहीं अशी स्त्री ; चांगल्या कुलांतील स्त्री; नुकतीच प्रसूत झालेली स्त्री; अत्युच्च वर्णाची ' ब्राह्मणाची' अविवाहित स्त्री. कारण, या स्त्रिया [ स्वतंत्र नसून ] आपापल्या जातीचे स्वाधीन असतात. ज्या स्त्रियांवर कुटुंबांतील माणसें [ निर्वाहासाठी ] अवलं- बून असतात अशा स्त्रियांस, तसेंच दुराचारी, वेश्या, नीच जातीच्या व निंद्य अवस्थेस पोंचलेल्या स्त्रियांस बोलावण्यास हरकत नाहीं. फिर्याद अर्जाची चौकशी केल्यानंतर महत्वाचे मुकदम्यांत वनवास करणारे संन्यासी व वानप्रस्थ यांस, त्यांस राग न येऊं देतां राजाने बोलावणें करण्यास हरकत नाहीं. काल व देश यांचा विचार करून, मुकदम्यांतील गोष्टींची सबलता किंवा निर्बलता पाहून, अशक्तादि मनुष्यांसही जरूर दिसेल तर राजानें ‘ २६' हळूहळू ' त्यांची प्रकृति राखून' आणवावें. कांहीं पुस्तकांत २८ बोलावर्णे करण्याचें संबंधानें व्यवस्था नारद सांगतो (ड)