पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० व्यवहारमयूख. [ जो पहिला ] निम्मे भाग तो [दिवसाचा] 'अष्टमभाग'. त्यापुढे व दोन प्रहरांपावेतों दीङ [ प्रहराचे ] अर्धप्रहर प्रमाणाचे जे तीन राहिले ते 'तीन भाग ' असे समजावें. न्यायाचें काम करण्यास वर्ज दिवस कोणते हैं संवर्त सांगतो “चतुर्दशी, अमावास्या, पूर्णिमा व अष्टमी या दिवशीं शहाण्यानें ” न्यायाचें काम करूं नये." बृहस्पति “वृद्ध, मंत्री, आणि आश्रित यांशीं सहवर्तमान त्या ( सभेत ) [ राजानें ] पूर्वाण्ही बसून [ न्यायाचे काम ] पहावें, व पुराणे, धर्मशास्त्रे, व अर्थशास्त्र यांचे अर्थ ऐकावे. " मुळांत ' तां' असें पद आहे त्याचा अर्थ सभा. 'अर्थशास्त्र' ह्मणजे नीतिशास्त्र. धर्मशास्त्र व नीतिशास्त्र यांच्यामध्ये परस्परांशी विरोध आल्यास काय करावें हैं नारद सांगतो “ धर्मशास्त्र व अर्थशास्त्र यांचा [ परस्पर ] विरोध आल्यास अर्थ- शास्त्रांत सांगितलेलें सोडून धर्मशास्त्रास अनुसरावें ". दोन धर्मशास्त्रांचा (स्मृतींचा ) पर- स्परविरोध आल्यास [ काय करावें हें ] याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० २१ ) “ दोन स्मृति एकमेकांचे विरुद्ध असतील तेथें प्राचीन काळापासून चालत आलेल्या न्याया- स. जी [ स्मृति ] अनुसरून असेल ती वरचढ समजावी ". २२ न्यायाकडे दुर्लक्ष करणा- रास दोष बृहस्पति सांगतो " [ युक्तीस सोडून ] केवळ [ धर्म ] शास्त्राचेच आश्र- यानें निर्णय करूं नये. युक्तीवांचून ( विचार किंवा न्याय पाहिल्यावांचून ) निर्णय केल्यास धर्मनाश होतो. [ राजानें ] देशाचारादिकही पाहिले पाहिजेत.. २ याविष- यीं बृहस्पति “ देशाचे धर्म, जातिधर्म, व कुलाचार प्राचीन कालापासून (प्राचीन काळचे लोकांनी ) जसे चालू केलेले असतील तसेच ते राखावे; तसें न केल्यास लोक संताप- तात ; [ राजावरील ] लोकांचें प्रेम नाहींसें होतें; राजाचे बळ (सैन्य ), व पैसा यांचा क्षय होतो. दक्षिणेंतील ब्राह्मणजातीचे लोक आपल्या मामाचे कन्येशी लग्न लावि तात. मध्यदेशांत [ ब्राह्मणनातीचे लोक ] नोकरीचा धंदा व शिल्पकामें करितात. आणि गोमांस खातात. पूर्वदेशांतील [ ब्राह्मण लोक ] मासे खातात व त्यांच्या बायका व्यभिचारांत निमग्न असतात. उत्तरेकडील [ ब्राह्मण लोकांच्या ] बायका "9 १ ' 6 दारू पितात व त्या रजस्वला स्थितीत असतां त्यांस पुरुष शिवतात. [ परंतु ] अशा . वर्तनाबद्दल ते प्रायश्चित्तास किंवा शिक्षेस पात्र होत नाहीत. वरील स्मृतींत ‘ पूर्वे याचा अर्थ पूर्व दिशेस राहणारे. 'पूर्वे' याचे ठिकाणी ' सर्वे ' असाही क्वचित् पाठ आहे. तेथें 'सर्वे ' ह्मणजे ब्राह्मणादिक. 'दम' ह्मणजे दंड किंवा शिक्षा. [ स्मृतीत अशा कर्माबद्दल ] प्रायश्चित्त दर्शविलेलें आहे तें या स्मृतीत सांगितलेले देशांहून भिन्न ठिकाणीं लागू समजावें, असें कांहींचे मत आहे. [' प्रायश्चित्तदमार्हकाः ] असें २१ बी० प० ९ पृ० १. २२ बी० प० ६ पृ० १ २३ बी० प०. ६ मृ० १.