पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १०९ व्यासाचें असेंच वचन आहे " ज्याचे पूर्वजांनी तेंच काम केलेलें अशा सशक्त शूद्रास सभ्यांचे ताब्यांत राहून मुकदम्यांतील सर्व सामुग्री जमविण्यासाठी साध्यपाल ' या हुद्या- वर नेमावें. " याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ३) “ दुसन्या कांहीं विशेष कामांत गुंतल्या- मुळे राजास जातीनें न्यायाचे काम पहावत नसेल तेव्हां सभासदांस मदतीस घेऊन न्या- याचे काम चालविण्यासाठीं त्यानें धर्मशास्त्रोक्त सर्व धर्म जाणणारा १७ असा ब्राह्मण [ आपल्या स्थानी प्रतिनिधि ह्मणून ] नेमावा. " राजा व अध्यक्षादिक यांची कामे बृहस्पति सांगतो; “ बोलण्याचें काम अध्यक्षाचे ; राजानें शासन (हुकूम देण्याचें काम ) करावें; मुकदम्यांतील तक्रारींची वं विषयांची चौकशी करण्याचे कार्य सभास- दांनी करावें; हिशेबनिसानें पैसा मोजावा; व चिटणविसानें मुकदम्यांतील लिहिणें लिहावें. " पुनः बृहस्पति “ राजानें पूर्वेस तोंड करून बसावें; सभासदांनी उत्तरेस, हिशेब- निसानें पश्चिमेस व चिटणविसानें दक्षिणेस तोंड करून बसावें. " 66 राजसर्भेतील ठरविलेले चौकशी करणाऱ्यांहून इतर चौकशी करणारे याज्ञव- ल्क्याने सांगितलेले आहेत ( व्य० श्लो० ३० ) ( १ ) जे अधिकारी [ न्यायाचे कार्यांत ] राजानें नेमिलेले असतात ते, (२) 'पूग ' संज्ञक, ३ ' श्रेणी' संज्ञक, आणि (४) 'कुल' संज्ञक. [ मंडळ्या किंवा जमाती ]-यांस पक्षकारांचा न्याय करण्याचे कामांत राजानें त्यांचे अनुक्रमाप्रमाणें ( ह्मणजे राजानें नेमिलेले अधिकान्यांस पूगांपेक्षां विशेष महत्त्व, पूगांस श्रेणीपेक्षां ज्यास्ती, श्रेणीस कुलांपेक्षां अधिक याप्रमाणें ) अधिक अधिक मान द्यावा " १८ ' नृपेणाधिकृताः ' ( राजानें नेमिलेले ) प्राड़िवाकादिक ( न्यायाधीश वगैरे ). निरनिराळ्या जातींचे असून निरनिराळे धंद्यांवर निर्वाह करणारे पण एका गांवांत राहणारे लोक ते ' पूग ' होत. पूगांचे लक्षणाविरुद्ध जे ते ' श्रेणी '. स्वजातीचे, नातलग, संबंधी, कुटुंबांतील पुरुष आणि बंधुवर्ग हे सर्व मिळून एकंदरांस 'कुल' संज्ञा. बृहस्पतीचेंही वचन आहे की, " वनांत फिरणाऱ्यांस वनांतच करण ( न्यायाचें ठिकाण) असावें; शिपायांस सेनेंत, तसेंच व्यापाऱ्यांस व्यापाऱ्यांचे मंडळ्यांत. ' 6 'करण' ह्मणजे सभा. 6 " " न्यायाचें काम चालविण्याची योग्य वेळ कात्यायन सांगतो 66 शास्त्रप्रणीत मार्गास अनुसरून व आपणांस जे अहित असतील त्यांस आपल्या हुकमतीखाली दाबलेले राखन न्यायाचीं कामें राजानें समेंत 'बसून दुपार होण्याचे आंत करावी. दिवसाचा एक - अष्टम भाग ( प्रातःकाळचा ) वजा करून पुढील तीन भाग हा न्याय करण्याचे कामांत अत्युत्तम काल असें शास्त्रांत सांगितलेले आहे. "" पहिल्या प्रहराचा १७ वी : १० १ पृ० २. १८ बी० प० १२ पृ०२. १९ तु (च). २०वी०प० ९ पृ० १