पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ व्यवहारमयूख. 66 १२. क्त (नेमिलेलेच ) पाहिजेत याविषयीं असें ह्यटलेलें आहे: 66 ज्यास धर्मशास्त्राचें ज्ञान आ- हे तो नियुक्त असो अथवा अनियुक्त असो, तो राजसभेत बोलण्यास ( मत देण्यास ) योग्य आहे. " 'बृहस्पतीनें प्राड़िवाकाचें ( न्यायाधिशाचें ) लक्षण सांगितलें आहे: मुकद्दम्यांत जो प्रश्न विचारतो किंवा [ जवानी झाल्यावर ] उलट सवाल करतो व जो प्रारंभीं [वादीप्रतिवादींची आपसांत समजी होण्यासाठीं वगैरे ] गोड भाषण करतो त्यास प्राड़िवाक असें ह्यटलेले आहे. """ अमात्याचें स्वरूप व्यास सांगतो; “ सर्व शास्त्रांचा अर्थ जाणणारा, ज्यास लोभ नाहीं, न्यायानेंच भाषण करणारा, शहाणा, ज्याचे पूर्वजांपासून त्याचे कुळांत तसा अधिकार चालत आलेला व जो विप्रजाति, अशा द्विजाला राजानें अमात्य (मंत्री) नेमावें. " झ्यास, या ठिकाणी ' विप्र' आणि 'द्विज' अशी द्विरुक्ति आहे तो, विप्र मिळत नस- क्षत्रिय व वैश्य यांचाही समावेश व्हावा ह्मणून. याविषयीं कात्यायन " जेथें विद्या- संपन्न विप्र लभ्य नाहीं तेथें त्याचे जागीं [ राजानें ] क्षत्रियाची योजना करावी; किंवा धर्मशास्त्र जाणता वैश्य नेमावा पण [ राजानें] हरप्रयत्न करून शूद्रास टा- ळावें. ११४ १५ 66 सभ्य कोणास ह्मणावें हें याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० २ ) " वेदशास्त्रार्चे ज्यांनी पुरे अध्ययन केलेलें आहे, जे धर्मशास्त्राचे नियम जाणतात, जे नेहेमी सत्य बोलतात, व जे मित्र आणि शत्रु यांस समदृष्टीनें पाहतात, अशांस राजानें सभा- सद नेमावें ". यांची संख्या किती असावी हें बृहस्पति सांगतो “ लोक ( जगांतील लौकिकव्यवहार ), वेद आणि धर्मशास्त्र हीं जे जाणतात असे सात, पांच किंवा तीन ब्राह्मण ज्या ठिकाणी बसतील ती सभा [ किंवा कचेरी ] यज्ञसभेतुल्य समजावी. " पुनः बृहस्पति 66 शब्द आणि अभिधान यांची तत्त्व जाणणारे, हिशेबीकामांत कुशल, पवित्र आचरणाचे, व ज्यांस अनेक लिपी लिहितां येतात अशा दोघां पुरुषांस राजानें हिशे- बनीस व चिटणीस नेमावें. " या वचनांत ' शब्दः' ह्मणजे व्याकरणशास्त्र; आणि ' अभिधान ' ह्मणजे कोश, असें समजावें. 98 कात्यायन " न्याय ज्यांस समजतो अशा वैश्यांस त्या सभेत हिशेब तपासनीस नेमावें ” [वचनांत] ‘तत्र’ आहे त्याचा अर्थ 'सर्खेत'. बृहस्पति “सभ्यांचे अधिकाराखालीं राहून साक्षीदारांस आणि वादीप्रतिवादींस बोलावणें करण्याचें व त्यांचे रक्षणाचें काम करणारा असा एक सत्यवादी व विश्वासु मनुष्य नेमावा". हा मनुष्य शूद्रच असला पाहिजे. १३ वि० प० १० पृ० २. १४ वि० प० ११ पृ० १. १५ वि० प० ११ पृ० २. १६ वि० प० १३ पृ. २.