पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १०७ त्यांचा निरनिराळा उल्लेख 'गोवली दर्द ' न्यायानें आहे असें समजावें. [ पूर्वी सांगितलेले ] अठरा भेदांचे स्वरूप पुढें स्पष्ट सांगण्यांत येईल. व्यवहारमातृकाः ह्मणजे दिवाणी कामाच्या आवश्यक गोष्टींच्या परिभाषा. बृहस्पति " [ राजानें ] किल्ल्याचे मध्यभागी स्वतंत्र घर बांधावें, जवळ पाणी आणि वृक्ष असावेत, [ आणि त्या घराचे ] पूर्वबाजूस योग्य लक्षणांनी युक्त अशी समे- ची जाग ( ह्मणजे दिवाणी काम करण्याची कचेरी) पूर्वाभिमुख करावी ". याच कचेरीर्चे [ नांव ] ' धर्माधिकरण ' ( न्याय चालण्याचें स्थान ). कात्यायनाचें असें वचन आहे: “ धर्मशास्त्राचे नियमांस अनुसरून ज्या ठिकाणीं खरें को- तें व खोटें कोणतें याचा निर्णय केला जातो त्या ठिकाणास धर्माधिकरण ह्मणायें. "" मनु ( अ० ८ श्लोक १ व २ ) " दिवाणीकाम करूं इच्छिणाऱ्या राजानें मन स्वस्थ करून व पोषाग साधा व अलंकार भूषणें बेताचीच घालून सर्भेत प्रवेश करावा; आणि धर्मशास्त्रजाणते असे ब्राह्मण आणि मंत्री यांच्या सहवर्तमान ( ह्मणजे त्यांस मदत घेऊन ) पक्षकारं लोकांचे काम पहावें ". याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० १) “वि- द्या संपन्न ब्राह्मणांस मदतीस घेऊन, आपले राग, लोभ, दूर केले आहेत असा होत्सा- त्या राजानें धर्मशास्त्राचे नियमांस अनुसरून व्यवहार ( न्यायाचें काम ) चालवावा. " राजा ह्मणजे ज्या कोणास प्रजापालन करण्याचा अधिकार असेल तो; क्षत्रियच असला पाहिजे असें नाही. कात्यायन प्राड्विवाक ( ह्मणजे न्यायाधीश ), मंत्री, ब्राह्मण, पुरोहित, आणि सभ्य ( न्यायाचे सर्भेत मत देण्यासाठी बसण्यास ज्यांस अधिकार मि- ळालेला असेल ते ) इतक्यांस मदतीस घेऊन जो राजा न्यायाचे काम चालवितो तो अशा प्रकारच्या धर्माचरणाचे योगोनें स्वर्ग वास पावतो. " येथें ब्राह्मण सांगितले आहेत ते अनियुक्त (नेमणूक केलेले नव्हत ) असें समजावें. परंतु सभ्य त्या कामासाठी नियु- 66 ८ पूर्वी सांगितलेले मनुवचनांत चोरी हा अपराध साहसाहून निराळा गणका आहे ह्मणून वरीक पंक्तीस स्त्रीसंग्रहणादि पदांत ' स्तेय ' पदही आहे असें समजावें. हें उपलक्षण ह्मणून समजावें. 'गोब- लीवर्द न्याय असाः-‘गो' शब्दाने गाई व बलीवर्द (बैल) हीं दोन्हीं समजली जातात ह्मणून एकट्या गो शब्दाचे प्रयोगांत दोहोंचा समावेश होत असतांही परंपरागत रूढि 'गाश्चआनय बलीवदश्च आनय . वगैरे बोलण्याची आहे. अशा स्थळीं गोबलीवर्दन्याय लागतो.. ९ वी० प० ३५०२. प० २ पृ० १० वी० प० ४ पृ० २ १० वी० प० ४ पृ १० ११ बी० प० ४ पृ० २. १२ मि० व्य ०