पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ व्यवहारमयूख. व्यवहार ह्मणजे कलह करणारे दोघे पक्षकारांत अन्याय करणारा कोण है माहीत नसतें त्याचा निश्चय करण्यासाठीं जो उपायरूप व्यापार तो ; मदनरत्नाकार ग्रंथकाराचे . मतें ज्यांत उपभोग आणि साक्षी हे पुरावे संभवतात असा वादिप्रतिवादी यांचे मध्यें उत्पन्न झालेला व्यापार ; अथवा परस्परांशी प्रतिकूल अशा तक्रारींचा, निश्चय कर- ण्यासाठीं जो उपायरूप व्यापार ; जेथें वादीचे दाव्याचा [ प्रतिवादीकडून ] कबूल- जबाब असतो, तेथें व्यवहार शब्दाचा प्रयोग गौण आहे. शुष्कवाद, वितंडवाद, वगैरेस व्यवहार हें पद लागूं नये ह्मणून [ज्यांत उपभोग आणि साक्षी हे पुरावे संभवतात तें, किंवा परस्परांशी प्रतिकूल अशा तकरारींचां निश्चय करणें हें ] पुंढील विशेषण दिलेलें आहे. 66 आतां व्यवहार शब्दाची व्याप्ति कोठें याविषयीं याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ५ ) स्मृतीचे किंवा परंपरागत आलेले आचारांचे मार्गास सोडून जर कोणी पुरुषांनी दुसऱ्या- वर जुलम, जबरदस्ती केली आणि त्यानें (पिडलेले माणसानें ) राजाकडे फिर्याद केली तर हा एक व्यवहाराचा विषय होय ". 'आधर्षितः' [असें पद वरील स्मृतीत आहे ] त्याचा अर्थ पीडा दिलेला वगैरे. व्यवहाराचे अठरा भेद मनु सांगतो ( अ० ८ श्लो० ४-५- ६-७ - ). त्यांत पहिला ( १ ) कर्जाची फेड न करणें, (२) अमानत, (३) मालकीवांचून विक्री, ( ४ ) भागीदारी, ( १ ) एकवार दिलेल्या वस्तूचें पुनः ग्रहण करणें, ( ६ ) रोजमुरा न देणें, ( ७ ) ठराव मोडणें, (८) खरेदी व विक्री रद्द करणे, ( ९ ) धनी व गुराखी यांचे दरम्यानचे कज्जे, (१०) हद्दीबद्दलचे कज्जे, (११) मारामार व शिव- गाळ, ( १२ ) चोरी, ( १३ ) साहस ( मोठे अपराध), (१४) व्यभिचार, (१५) स्त्रीपुरुषांचे ( पतिपत्नींचे परस्परांस अनुलक्षून ) धर्म, (१६) वांटणी, ( १७ ) जुवे खेळणें, आणि (१८) शर्यती मारणें. व्यवहारासंबंधाचे कार्यास हीं अठरा नावें येथें " ( लोकांत प्रसिद्ध आहेत )." ' अनपकर्म ' ह्मणजे पुनः न देणे. अनुशयः ' ह्मणजे पश्चात्ताप. ' द्यूतं ' ह्मणजे निर्जीव वस्तु लावून [ जुवा ] खेळणें. ' समाव्हयः ' ह्मणजे सजीव वस्तु लावून [जुवा ] खेळणें. "मनुष्यांस ठार मारणें, चोरी करणें, पराचे स्त्रीस अंगाखालीं घालणें, दोन्ही प्रकारचें पारुष्य ( ह्मणजे शरिरास इजा व शिवीगाळ ) याप्र- माणें साहसाचे प्रकार चार करणें योग्य होयँ " असें बृहस्पतिवचन आहे ; त्या वरून वरील मनुवचनांत पराचे स्त्रीस अंगाखाली घालणें व वाक्पारुष्य ( शिवीगाळ ) आणि दंडपारुष्य ( पराचे शरिरास इजा करणें ) हे प्रकार साहसाचे पोटभेद असतांही ७ बी० प० १५२ पृ०२ ५ प० पृ० २, ६ मि. व्य० प० २५० २; वी० प० ८९ पू० २. 6