पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्री गणेशायनमः व्यवहारमयूख. १. राजनीति ( ह्मणजे राजानें कोणत्या धर्मानें चालावें या संबंधाचे नियम ) [ पूर्वी ] सांगितले. [आंतां] सूर्याच्या चरणकमलांचें वंदन करून [मी ] नीलकंठ • नामक ग्रंथकार ] ' व्यवहारनिर्णय ' विषयावर पुढील लहानसा ग्रंथ रचितों. २. जो ब्राह्मणश्रेष्ठांचा शिरोमणी, सर्व धर्मशास्त्रांचा ज्ञाता, सर्व कल्याणांनी युक्त, व काशीक्षेत्रांत सर्व मनुष्यमात्राचा उपदेष्टा अशा [ माझ्या ] शंकरनामक गुरूत (पि- त्यास ) मी नमस्कार करतों'. ३. परस्परांशीं विरुद्ध जे दोन मार्ग त्यांचे प्रतिपादन करण्यासाठीं जो परमपुरुष या जगांत दोन स्वरूपांनी' प्रकट झाला होता तोच आतां एकाच रूपानें श्रीशंकरभट्ट ह्मणून उत्पन्न झाला ; आणि त्यानें मीमांसकांचें अद्वैत मत' ( जीवात्मा व परमात्मा हे एकच आहेत असें ) हैं स्वीकारिलें. ४. ज्यास शास्त्राचा आधार नाहीं अशीं वितंडवादी पुरुषांनी मानलेलीं कांहीं व- चनें निराधार ह्मणून [ या ग्रंथांत ] गाळली आहेत, परंतु त्यामुळे विषयांचे प्रतिपादनाचे संबंधाने या ग्रंथांत कांहीं कमी झालें असें नाहीं; कारण खपुष्प नसल्यानें पूजेस कमी- पणा येत नाहीं [ असा साधारण न्याय आहे ]. (१) हा श्लोक आपले बापाचे नमनार्थं मंथकाराने केला आहे, तरी सर्व विशेषणें काशीक्षेत्रा- वा स्वामी जो शंकर त्यास लागतात. काशीश्वर शंकरास हीं विशेषणे लाविल्याने असा अर्थ होतो:-ज्या च्या मस्तकीं चंद्र हाच एक भूषण आहे, जो वृषाचा (नंदाचा ) स्वामी, ज्यास अर्धांगी पार्वतीचें सान्नि ष्य आहे, व जो काशीक्षेत्रांतील सर्वांस तारकोपदेशकर्ता ; असा जो शंकर त्यास मी नमस्कार करतो. [ यास आधार नारायणभट्टकृत काशीमृतमोक्षनिर्णय ग्रंथ वगैरे पदा ]. ५ वी० प० १ ० २ (२) शंकराचार्य आणि कुमारिल भट्ट. (३) व्यास व तदनुयायी यांचे मत. (४) ' खपुष्प' ह्मणजे 'आकाशपुष्प.' असें फूल वस्तुतः नाहींच, त्या अर्थी तें नसल्यानें पूजेला कमीपणा जसा येणार नाहीं, तसा निराधार मतांचा त्याग केल्याने ग्रंथाचे महत्वांत कमी होणार नाहीं. या श्लोकांत ‘ऊनोक्तितानात्र' असा पाठ आहे. परंतु 'उनोक्तितातोन ' असाही पाठभेद आहे. ( क ) १४ -