पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० विवाहाविषयीं. झालें त्याला काही अंशी तरी नुकसानीं देवविण्यांत कोटला कांहीं प्रतिबंध आहे असे मला वाटत नाहीं. " ह्यास अनुकूल देशरिवाज पाहण्यांत आला नाहीं. ( ४२.) सदरों लिहिल्याप्रकारची फिर्याद चालेल असें कांहीं न्यायाधीशांचें मत आहे, तरी तशा फिर्यादींत हुकुमनामा कशा प्रकारचा द्यावा याविषयीं मतभेद आहे. स० वी० रि० व्हा० ६ पान १०९ येथें जो ठराव आहे त्यांत मि० जस्टिस सेटन कार यांचा अभिप्राय असा होता की, नवऱ्याच्या फिर्यादीवरून बायकोनें त्याच्या घरीं राहण्यास जावें. असा हुकुमनामा कोर्टाला देतां येतो व त्या हुकुमनाम्याची बजा- वणी, दाव्यांतील प्रतिवादी ह्मणजे तक्रार करणारी स्त्री हिला धरून नवऱ्याच्या हवाली देऊन, करितां येते. परंतु मि० जस्टिस माफर्सन व मि० जस्टिस जाक्सन यांचा अभिप्राय असा होता की, विवाहासंबंधी आपले सर्व हक्क उपभोगण्याचा वादीचा हक्क आहे, व प्रतिवादीनें त्याच्या घरीं राहण्यास जावे असा हुकुमनामा वादीस देतां येईल. न्याहून बायकोला धरून नवऱ्याच्या हवाली करावी असा हुकुमनामा कोर्टाला देतां येणार नाहीं. वर सांगितलेला हुकूम न मानून बायको नवज्याकडे न जाईल तर दिवाणी कायद्याचें ( आक्ट १४ सन १८८२ इसवी ) कलम २६० प्रमाणें प्रतिवादीला कैद करून अगर तिची मिळकत जप्त करून अगैर दोनही मार्गानी कोटीनें बजावणी करावी. मि० ज- स्टिस सेटन कार यांचा ठराव देशचालींस अनुसरून होता असे दिसतें; कारण त्यांनीं आपल्या ठरावांत दुसरे ठराव नमूद केले आहेत. त्यांशिवाय बारोडेल व्हा० १ पा० ३५३ या ठरावांत प्रतिवादीनें वादीची स्त्री वादीच्या हवाली करावी असा ठराव केला होता. हा ठराव मान्य ( ४३.) बं० ला० रि० व्हा०. १४ पा० २९८ यांत मि० जस्टिस मार्केबी यांणी असे ठरविलें आहे कीं, फक्त कोर्टानें विवाह झाला असून तत्संबंधी उप्तन्न होणारे हक्क उपभोगण्याचा अधिकार वादीस आहे इतकेंच ठरवावें. पकडून हवाली करण्यानें अग-- र कैदेनें अगर मिळकतीच्या जप्तीनें बजावणी करितां येणार नाहीं. करण्याजोगा आहे की नाहीं याविषयी मला संशय आहे. फक्त विवाह झाला असे ठरवून घेण्याची जरूरही पडत नाहीं, व तो अधिकार कोर्टाने आपल्याकडे न्यावा हें मला प्रशस्त दिसत नाहीं; कारण विवाहाबद्दलचा आचार त्या विषयावरचें जे धर्मशास्त्र आहे ह्मणून ह्मणतात त्याशी अगदी मिळून नाहीं. विवाह चांगला वाईट ठरविण्यास कोर्टाला ग्रंथांवांचून साधन नाहीं; व एकदां ग्रंथांवरून विवाहाचा निर्णय करण्याचे काम, कोर्टानें अंगावर घेतलें की भलभलतेच ठराव होऊन अगदी घोंटाळा होईल. याची उदाह- रणेही घडली आहेत.

.( ४४. ) वरील घोंटाळा व मतभेद हल्लींच्या मुदतीचा कायदा व दिवाणी काम