पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• ३४ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ ४२ नामा मिळण्यासाठी तिजवर दिवाणी कोर्टात नवऱ्याला दावा आणतां येतो. मुदतीचा कायदा आक्ट १५, सन १८७७, शेड्यूल २, रकम ३५ यांत अशा प्रकारच्या दाव्यां- बद्दल मुदत सांगितलेली आहे, यावरून असे दावे हल्लींच्या कायदे करणारांसही अनभिमत नाहींत हैं उघड होतें. वास्तविक पाहतां विवाह झाला ही गोष्ट एकदां शाबीत झा ल्यातर, त्या विवाहापासून एकमेकांस एकमेकांच्याविरुद्ध जे हक्क उत्पन्न होतात ते हक्क उपभोगण्यास पक्षकारांला कोर्टानें व्यवहाराच्या कामी मदत कां करूं नये यावि- षयीं कांहीं कारण दिसत नाहीं. कोटसिमोर आलेले जे कज्जे आढळतात त्यांत • ४३ नवन्याच्या फिर्यादी मात्र आढळतात. परंतु तशी फिर्याद स्वधर्मानें वागणाऱ्या स्त्रियांची नवऱ्यावर चालण्यास कांहीं बांध दिसत नाहीं. हिंदुधर्मशास्त्रांत भार्या ही पतीचा उत्तम सखा असें ह्मटलेले आहे. यावरून विवाहाच्या संबंधानें वधुवरांचे व्यवहारसंबंधी हक्क समान असेंच होतें. ह्मणून असे दिसतें कीं, एकाद्या मनुष्यानें आपल्या धर्मपत्नीचा योग्य कारणावांचून त्याग केला असता, त्या स्त्रीनें मला घरी नोंदवावें अशी फिर्याद नवऱ्यावर आणिली तर कोर्टाला तसा हुकुमनामा द्यावा लागावा. परंतु तसे शास्त्ररीत्या व रूढींवरून होईलच असे मला वाटत नाहीं; कारण त उदाहरण दृष्टीस पडलें नाहीं. ( ४१.) यासंबंधानें गाथाराम मिस्त्री वि० मोहिते कोचीन अत्यादमूनी, ४४ या . "कज्यांत मि० जस्टिस मार्कबी यांचा ठराव आहे तो लक्षांत ठेवण्याजोगा आहे. ते आरंभी (पा० ३०० ) असें ह्मणतात की, “नवराबायकोचा संबंध एकदा शांचीद झाला, ह्मणजे नवश्यानें भार्येशी व भार्येनें नवऱ्याशी राहिले पाहिजे असा परस्परांचा हक्क आहे असे कायदा मान्य करितो, उभयतांपैकी कोणी त्या हक्कास अनुसरून वागण्याचें नाकारील तर तसे वागले पाहिजे असा ठराव कोटींनी अवश्य केला पाहिजे. तसेंच भार्येला नवयाकडे परत येण्याच्या कामी अथवा नवयाला भार्ये- कडे परत जाण्याच्या कामीं कोणी हरकत करील तर त्यास दुसऱ्यांच्या हक्काल हरकत केल्याबद्दल शिक्षा करण्यांत किंवा ज्याचें सदरच्या अपकृत्यानें नुकसान ४२. पहा झोटनबिबी वि. अमरिचंद, स. वि. रि. व्हा. ६ पान १०५; कुबर खनसमा वि. जान खसनमा, स. वि. रि. व्हा. ८ पान ४६७; मुनशी बझळूर रहिम वि. शमसूनिसा बेगम. मू. इं. अ. व्हा. ११ पान ५५१. ( हा दावा मुसलमान पक्षकारांच्या दरम्यान होता. ) हर्ख शंकर वि. रायजी मनोहर, मुं. हा. रि. व्हा. १ पान ३५३. दादाजी वि. रखमाबाई इं. ला. रि. १० मुं. ३०१. ह्या . प्रसिद्ध मुकदम्यानें आतां सर्व शंका दूर झाली आहेच. ४३. पहा ऐतरेय ब्राह्मण पं० ७ अ० ३, १३; ४४. बं० ला०रि० व्हा० १४ पृ० २९८. आश्वलायन गृह्यसूत्र अ० १ कं० ७ सू० १९