पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. पळसाची पानें, उदुंबराची पानें, कमळाची पानें, बेलाची पानें, आणि कुश यांचा अनुक्रमानें एक एक दिवस काढा पिऊन [ पांच दिवस ] राहिल्यास [ या कुच्छ्रास ] 'पर्णकृच्छ्र' ह्मणावें असें सांगितलेलें आहे. कडकडीत दूध, कडकडीत तूप, कडकडीत पाणी हीं अनुक्रमानें एक एक दिवस पिऊन [ शेवटीं ] एक रात्र उपोषण केल्यास यास 'तप्तकृच्छ्र' असें ह्मणतात. ३१८ [ प्रथम दिवशीं ] एक वेळ जेवल्यानें आणि [ दुसरे दिवशीं ] संध्याकाळी जेव- ल्यानें, व [तिसरे दिवशीं ] अयाचित वृत्तीनें राहून [ चवथे दिवशीं ] उपवास केल्यानें [ हे चार दिवसांचें व्रत ] 'पादकृच्छू' होतें अर्से सांगितलेलें आहे. ३१९ हैं 'पादकृच्छू' कसें तरी तीन वेळ केल्यास त्यास 'प्राजापत्य ' कृच्छ्र असें ह्मण- तात. एका ओंजळीत जितकें अन्न राहील तेवढें खाऊन हैं [ प्राजापत्यकृच्छ्र ] के- ल्यास त्यास ' अतिकृच्छ्र ' ह्मणतात. ३२० एकवीस दिवस दूध पिऊन राहिल्यास त्यास ' कृच्छ्रातिकृच्छ्र' असें ह्मणावें. बारा दिवस [ सतत ] उपवास केल्यास [ त्या कृच्छ्रास ] ' पराक ' ह्मणतात. ३२१ पेंड, तांदुळांची पेज, ताक, पाणी, सातूंचें अन्न हीं अनुक्रमानें एक एक दिवस खाऊन [ शेवटीं ] एक दिवस उपोषण केल्यास यास 'सौम्य' कृच्छ्र ह्मणतात. ३२२ ह्या [ वर सांगितलेले पांच पदार्थांपैकी ] अनुक्रमानें प्रत्येक पदार्थ तीन तीन दि- वस खाऊन राहिल्यास. ह्या पंधरा दिवसांचे [ कृच्छ्रास ] 'तुलापुरुष' कृच्छ्र असें ह्मणतात. ' ३२३ मोराचे अंड्याएवढें एक घांस अन्न प्रतिपदेस व पुढे तिथीचे संख्येप्रमाणे घांसांची संख्या वाढवीत पौर्णिमेपावेतों शुद्धपक्षांत [अन्न खाऊन] व वद्यपक्षांत प्रतिपदेपासून एक एक घांस कमी करीत [कृष्ण चतुर्दशीपावेतों ] घांसांची संख्या उतरीत जाऊन अमा- वास्येस उपोषित राहतो त्यानें 'चांद्रायण' कृच्छू केलें [ अर्से ह्मणावें ]. ३२४. कसे तरी दोनशें चाळीस घांस अन्न खाऊन एक महिना राहिल्यास हें दुसऱ्या प्रकारचें 'चांद्रायण' कृच्छ्र झालें. ३२५. कृच्छ्र अथवा चांद्रायण हीं जो करील त्यानें दररोज नियमानें त्रिकाल स्नान क रावें, पवित्र सूक्तांचा जप करावा, व [ खाण्याचे ] घांस गायत्रीमंत्रानें करावे. अभिमंत्रित ज्या पापास प्रतिपदोक्तप्रायश्चित्त निर्दिष्ट नाहीं त्यापासून शुद्धि [ होते ], [ परंतु ] धर्मार्थ ( धर्म वृध्यर्थ ) हैं जो करतो तो [ मरणानंतर ] प्राप्त होतो. ३२६. चांद्रायणानें चंद्रलोकास ३२७ आपले कल्याण व्हावें अशा बुद्धीनें जो कृच्छ्रकरील त्यास मोठी संपत्ति प्राप्त