पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. १०३ होईल. परिपूर्ण अंतःकरण तिकडे लावून जो कृच्छ्र करील त्यास महान् यज्ञाचें फळ प्राप्त होईल. ३२८ हे वर सांगितलेले याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलेले धर्म ऐकून महात्मा, योगिजनांत श्रेष्ठ व ज्याचे तेजास पार नाहीं अशा त्या याज्ञवल्क्यऋषीस [ श्रवणकर्ते ] ऋषि ह्मणा- ले की, ३२९ “ जे ह्या धर्मशास्त्राचा अभ्यास निरालस्याने करतील त्यांची या लोकीं कीर्ति होईल व ते स्वर्गास जातील; ३३० विद्यार्थ्यांस विद्या प्राप्त होईल ; धनकामास धन; आयुष्कामास दीर्घ आयुष्य; व लक्ष्मीकामास संपत्ति. ३३१ श्राद्धकर्माचे प्रसंगी निदान तीन लोक तरी या स्मृतींतून जो ऐकवील त्याचे पित- रांस अक्षय्य तृप्ति होईल यांत संशय नाहीं. ३३२ या [ धर्म ] शास्त्राचें अध्ययन केल्यानें ब्राह्मणास योग्यता प्राप्त होईल, क्षत्रियाचा जय होईल, व वैश्यास द्रव्य व धान्य हीं पुष्कळ मिळतील. ३३३ जो विद्वान् अमावास्या व पौर्णिमेस हैं [ धर्मशास्त्र ] द्विजांस ऐकवील त्यास यज्ञ केल्याचें फळ प्राप्त व्हावें, असा आपला आशीर्वाद असावा. " ३३४ ऋषींचें असें भाषण ऐकून याज्ञवल्क्यऋषीचे अंतःकरणास संतोष झाला; व स्व- यंभु परमेश्वरास नमन करून याज्ञवल्क्य ऋषि ह्मणाला की, "तथास्तु" (तसें असो). ३३५ ॥ समाप्त ॥