पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. १०१ क्ताचा [ ४० वेळ ] जप केल्यास [ पापापासून ] मुक्त होतो. यांनी प्रत्येकीं ( वर सांगितलेल्या तिन्ही पातक्यांतील दर एकानें ) प्रायश्चित्ताचे शेवटीं गोदान द्यावें. ३०५ ज्या उपपातकाबद्दल [ स्पष्ट ] प्रायश्चित्त सांगितलेलें नाहीं त्याच्या दोषापासून व इतर सर्व पातकांपासून मुक्त होण्यासाठी पातक्यानें शंभर प्राणायाम करावे. ३०६ [ अज्ञानानें ] रेत, विष्ठा, किंवा मूत्र पोटांत गेल्यास [त्यांचे शुद्धीसाठी] द्विजोत्त- मानें ओंकारांनी अभिमंत्रित सोमवल्लीचा पवित्र रस प्यावा. ३०७ अज्ञानानें जीं पापें दिवसा किंवा रात्री घडतात ती सर्व त्रिकालसंध्याविधि केल्यानें नाश पावतात. ३०८ [ विश्वानिदेवसवितारित्यादि वाजसनेयशाखेतील ] ' शुक्रिय ' नामक आरण्य- काचा जप आणि विशेषकरून गायत्रीजप, तसेंच एकादशिनी ( अकरा वेळ रुद्राचा (पाठ) हे मंत्र सर्व पापें दूर करणारे आहेत. ३०९ आपणांस पातक घडलें असें [ जेव्हां जेव्हां ] द्विजास वाटेल त्या त्या प्रसंगी त्यानें गायत्रीमंत्रानें तिलांचा होम करावा, आणि तिलदान करावे. ३१० या जगांत जो वेदाचे अभ्यासांत तल्लीन झालेला आहे, जो क्षमाशील व जो पंच- महायत्रांचे क्रिर्येत तत्पर आहे त्याला अत्यंत मोठमोठ्या पापकर्मापासून उद्भवणारे दोषही स्पर्श करीत नाहींत. ३११ वात भक्षण करून, दिवसभर उभ्याने काढून. रात्र पाण्याने घालवून, व सूर्याकडे पहात राहून सहस्र गायत्रीजप केल्यास, [असें करणारा ], ब्रह्महत्येच्या पातकाशिवाय, इतर सर्व पातकांपासून मुक्त होतो. कृच्छ्रादि प्रायश्चित्तांचीं लक्षणें. ३१२ ब्रह्मचर्यदीक्षा, दया, क्षमा, दान, सत्य, सरळपणा, हिंसा न करणें, चोरी न करणें, वच- नांत माधुर्य राखणें, आणि इंद्रियांचा निग्रह, यांस 'यम' (निग्रह) असे लगतात. ३ १३ स्नान, मौन, उपवास, यज्ञ, वेदाभ्यास, कामनिग्रह, गुरूची शुश्रूषा, पवित्रता, क्रो- धाचा निग्रह, आणि अप्रमाद यांस 'नियम' असें ह्मणतात. ३१४ गोमूत्र आणि गोमय, दूध, दहीं, आणि तूप, आणि दर्भ बुडवून ठेवलेले पाणी हीं भक्षण करून राहून दुसरे दिवशीं जो उपोषण करील त्याने ' सांतपन ' [ नांवाचें ] कृच्छ्र केलें [असें समजावें ]. ३१५ वर सांगितलेले [ सांतपनाचे गोमूत्रादि ] सहा पदार्थापैकीं दररोज अनुक्रमें एक एक खाऊन सहा दिवस कोणी सांतपन कृच्छ्र करील व सातवे दिवशीं उपोषण करील, तर या सात दिवसांचे कृच्छ्रांस ' महासांत पन ' कृच्छू पटलेले आहे. ३१६