पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० याज्ञवल्क्यस्मृति. नें भरलेली मातीची घागर देऊन गांवाबाहेर नेववून तेथें ती ओतून टाकवावी, आणि त्यास ( पतितास ) कोणत्याही कार्यास घेऊ नये. २९९ [ आवश्यक ] प्रायश्चित्त करून तो आपल्या बंधुवर्गांत पुनः परत येईल तर [ वर सांगिल्याप्रमाणेंच ] पाण्याची दुसरी घागर त्यांनी नेऊन ओतवावी. त्याची निंदा करू नये, आणि त्याच्याशी सर्व प्रकारें समागम ठेवावा. २९६ पतित स्त्रियांविषयीं हाच विधि सांगितलेला आहे. मात्र घराचे जवळ त्यांस राहा- वयास जागा द्यावी, व अन्नवस्त्र देऊन (अ ) त्यांचे रक्षण करावे. २९७ स्वजातीहून नीच जातीचे पुरुषाशी संग करणे, गर्भपात करणें, पतीचा प्राण घेणें, ही कृत्ये स्त्रीयांच्या पतितत्वास खचीत मुख्य हेतु होत. २९८ शरणागताचा ज्यांनी प्राण घेतला, स्त्रीहत्या किंवा बालहत्या ज्यांनी केली, तसेंच कृतघ्न मनुष्य, यांनी जरी [ आवश्यक ] प्रायश्चित्तं केली, तरी त्यांच्याशी कधीही सहवास करूं नये. ] २९९ [ मनुष्याला पुनः स्वजातींत घेण्याचे वेळेस ] पाण्याची घागर [ गांवाबाहेर ] ओ- तल्यावर स्वजातिबंधूंचे समक्ष त्याने यवधान्य गाईस चारावें. प्रथम गाईंनीं अशा पुरुषाचा सत्कार केल्यानंतर ( ह्मणजे त्यांनी गवत खाल्यावर ) त्याच्या बंधूंकडून सत्कारास तो पात्र होतो. ज्याचे पाप प्रसिद्ध झाले त्याने पंचांनी ठरविलेलें प्रायश्चित्त करावें. गुप्तं प्रायश्चित्तें. ३०० ज्याचें पाप दुसन्यास कळलें नाहीं त्यानें गुप्तपणे प्रायश्चित्त करावें. ३०१ ब्राह्मणाचा वध करणारा तीन रात्र उपोषण करून ' अघमर्षण' सूक्ताचा जप पा- ण्यांत उभे राहून करील आणि पुष्कळ दूध देणारी गाय दान देईल तर तो [ ब्रह्महत्येच्या पातकापासून ] मुक्त होईल; ३०२ अथवा [ पापशुद्धीसाठीं त्यानें ] एक दिवस वायुभक्षण करून नंतर पाण्यांत उभें राहून ' लोमभ्यः स्वाहा' इत्यादि [ आठ ] मंत्रांनीं [ एक एक मंत्राने पांच पांच ] चा- ळीस घृताहुती अग्नींत द्याव्या. ३०३ तीन रात्री उपोषण करून कूष्मांडीऋचांनी तुपाच्या आहुती [ अन ] देईल तर [ मद्यपी ] शुद्ध होईल. ब्राह्मणाचे सोनें चोरणाऱ्यानें पाण्यांत उभे राहून 'रुद्र' संज्ञक - मंत्रांचा [ ११ वेळ ] जप केला तर तो [ पापापासून ] मुक्त होईल. ३०४ गुरुपत्नीशी गमन करणाऱ्या [ पातक्यानें ] [ त्रिरात्र उपोषण करून ] पुरुषसू- (अ.) वस्त्र मलिन असावें. विज्ञानेश्वर..