पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्विताध्याय. ९९ अग्नीवर पुरोडाशाच्या (तांदुळाच्या शिजलेले पिठाच्या ) आहुती द्याव्या; किंवा वायूस उद्देशून पशुयज्ञ करावा. २८७ [ शास्त्रोक्त रीतीनें ] आज्ञा मिळाल्यावांचून भावजईशीं जो गमन करील त्यानें वांद्रायण प्रायश्चित्त करावें. आपल्या पत्नीशीं ती रजस्वला असतां गमन करील त्यानें तीन दिवस उपोषण करून तूप प्याले ह्मणजे तो शुद्ध होईल. २८८ व्रात्य (शास्त्रोक्त संस्कार ज्याचे झालेले नाहींत) अशा ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य, यज- मानासाठीं जो यज्ञ करील, व ज्यानें दुसऱ्याच्या हत्येसाठी अनुष्ठान केलें, त्यानें तीन कृच्छ्र- प्रायश्चित्ते करावी. ज्यानें वेद भ्रष्ट केले, व शरणागताला ज्यानें आश्रय न देतां निराश्रित सोडलें, त्यानें [ प्रायश्चित्तार्थ ] एक वर्ष यवांचें अन्न खाऊन रहावे. २८९ ज्यापासून जें दान घेऊं नये तें त्यापासून घेतल्यास घेणारा गाईचे गोठ्यांत एक महिना स्त्रीसंग वर्ज करून राहील, व दूध पिऊन तत्पर अंतःकरणानें गायत्रीजप करील, तर तो [ असत्प्रतिग्रहाचे ] दोषापासून मुक्त होईल.. किरकोळ प्रायश्चित्तें. २९० गाढवांनी किंवा उंटांनी ओढलेले गाडीत जो बसेल, नग्न होऊन जो स्नान किंवा भोजन करील, किंवा दिवसास स्वस्त्रसिंग करील, त्यानें स्नान करून पाण्यांत उभे राहून प्राणायाम केल्यास [ तो दोषमुक्त होतो ] - २९१ आपल्या गुरूंस (मातापिता, इत्यादि वडील ) अहंतेनें जो तुच्छ करील, किंवा त्यांस धमकी देईल, वादविवादांत ब्राह्मणाचा जो पराभव करील, किंवा वस्त्राने त्याला बांधील, त्यानें [ अशा रीतीनें हुर्मत घेतलेले पुरुषाची ] तत्काळ क्षमा मागावी व एक दिव- स उपोषण करावे. १९२ [ मारण्यासाठीं ] ब्राह्मणावर काठी उगारल्यास एक कृच्छ्रप्रायश्चित्त; [ ब्राह्म- णास ] खाली पाडल्यास एक अतिकृच्छ्रप्रायश्चित [ सांगितलेलें आहे ]. रक्त काढलें असल्यास कृच्छ्रातिकृच्छ्र प्रायश्चित्त; आणि जेथें, रक्त काढलें असेल, पण खालीं पडलें नसेल, तेथें एक कृच्छ्रप्रायश्चित्त [ सांगितलेलें आहे ]. २९३ [ ज्या कृत्यास ] प्रायश्चित्त [ स्पष्टपणें ] सांगितलेलें नाहीं, तेथें देश, काल, [ पा- पकर्त्याचें ] वय, शक्ति, व पापाचे स्वरूप यांचा फार यत्नाने विचार करून प्रायश्चित्त ठरवावें. भ्रष्टांस अनाश्रित सोडणें- २९४ स्वजातीपासून जो पतित झाला त्याच्या बंधुवर्गांनी एका दासीचे डोक्यावर पाण्या-