पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ याज्ञवल्क्यस्मृति. कारणावांचून उगीच कोणी औषधी झाड तोडल्यास त्यानें एक दिवस दूध पिऊन राहून गाईचे पाठीमागून [ती जाईल तिकडे ] जावें. २७६ वेश्या, वानर, गाढव, कुत्रे, उंट किंवा इतर पशु किंवा गाय, यांनी चावल्यास [ त्याचे शुद्धयर्थ ] पाण्यांत उभे राहून प्राणायाम करावा व तूप प्यावें ह्मणजे तो नि- र्दोष होतो. २७७ [ स्त्रीसंयोगप्रसंगावांचून अयोग्य प्रसंगी मनुष्याचें ] रेतस्खलन झाल्यास 'य- न्मेऽद्यरेतः' इत्यादि दोन मंत्रांनी त्या रेताचें अभिमंत्रण करावें; आणि अनामिकेनें दोन्ही स्तनांचा मध्यभाग व भिवयांचा मध्यभाग यांस स्पर्श करावा. २७८ पाण्यांत आपले प्रतिबिंब पाहिल्यास ' मयितेजः' या मंत्राचा जप करावा. अप- वित्र वस्तु पाहिल्यास, किंवा कोणास चुकून पाय लागल्यास किंवा मारल्यास किंवा वाईट शब्द बोलल्यास किंवा असत्य बोलल्यास गायत्रीमंत्राचा जप करावा. २७९ ब्रह्मचर्यव्रतांत असलेले द्विजानें स्त्रीगमन केल्यास तो व्यभिचारपातकी होतो. नैर्ऋतीदेवतेचे उद्देशानें गाढवाचा यज्ञ केल्यास तो पापमुक्त होईल. २८० शरीरप्रकृति चांगली असतां सतत सात दिवस भिक्षा न मागितल्यास आणि अग्निकार्य न केल्यास [ ब्रह्मचाऱ्यानें ] ' कामावकीर्ण' इत्यादि दोन मंत्रांनी दोन आहु- ती अग्नीत द्याव्या; २८१ [आणि] अग्निसन्निध उभे राहून 'समासिंचंतु ' या मंत्राचा जप करावा. मध किंवा मांस खाल्ल्यास त्यानें कृच्छ्रप्रायश्चित्त करून इतर प्रायश्चित्तें करावी. २८२ गुरूचे इच्छेचे प्रतिकूल कांहीं घडल्यास जेणेंकरून गुरु संतुष्ट होईल अशी गोष्ट केल्याने दोषमुक्ति होते. गुरूनें आपल्या कामासाठी बाहेर पाठविलेला शिष्य [ त्या का- र्यांत ] मरेल तर गुरूनें तीन कृच्छ्रप्रायश्चित्तें करावी. २८३ ब्राह्मणाचें कांहीं बरें करीत असतां [ त्या कारणानें ] ब्राह्मण मरेल तर दोष घडत नाही. तसेंच गाय किंवा बैल यांस एकादे औषध देण्याचे कार्यंत किंवा डागण्याचे कामी [ गाई बैलांस ] इजा झाल्यास [ औषध किंवा डाग देणारा ] पापी होत नाही. २८४ दुसऱ्याचें पाप खऱ्या रीतीनें जो बोलून दाखवितो तो तितक्याच पापाचा दोषी होतो ; खोटसाळपणानें दुसन्यावर पापाचा आरोप करणारा आरोपित पापाचे दुप्पट पापा- चा दोषी होतो ; शिवाय आरोपित मनुष्यांची सर्व पापें त्यास लागतात २८९ जो महापातकाचा किंवा उपपातकाचा खोटा आरोप दुसऱ्यावर घालतो त्यानें [ पापशुद्धीसाठी ] एक महिनाभर पाणी पिऊन जप करीत इंद्रियनिग्रहानें रहावें. २८६