पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रायश्चित्ताध्याय. वैश्याचा वध करणारानें हैं [ वर सांगितलेलें ] प्रायश्चित्त एक वर्षपावेतों करावें; किंवा शंभर गाईंचें दान करावें. शूद्राचा वध करणारानें है प्रायश्चित्त सहा महिने करावें; किंवा दहा गाईंचें दान द्यावें. २६७ 2 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व शूद्र या वर्णांतील वाईट चालीच्या स्त्रीचा वध केल्यास त्या पातकापासून शुद्धि होण्यासाठी अनुक्रमानें कातड्याची पिशवी, गाय, आणि शेळी किंवा मेंढी यांचे दान करावें. २६८ विशेष वाईट चालीची नसलेले स्त्रीचा वध केल्यास, शूद्रवध करणारास सांगितलेलें प्रायश्चित्त करावें. ज्यांचे शरिरांत हाडे आहेत अशीं [ नीच जातीचीं] एक हजार जनावरे मारल्यास, किंवा ज्यास हार्डे नाहीत अशीं एक गाडाभर जनावरें मारल्यास, असें करणारानें शूद्रहत्या प्रायश्चित्त करावें. २६९ मांजर, पाल, मुंगूस, बेडूक, किंवा पक्षी मारल्यास [ मारणारानें ] तीन दिवस दूध पिऊन राहावें; किंवा [प्राजापत्य ] कृच्छ्रांचा चतुर्थीश प्रायश्चित्त करावें. २७० हत्ती मारल्यास निळ्या रंगाच्या पांच पोळांचें दान करावें. पोपट मारल्यास दोन वर्षाचे वासरूं दान द्यावें. गाढव, शेळी, किंवा मेंढी मारल्यास एक पोळ दान द्यावा. क्रौंच पक्षी (करकोचा ) मारल्यास तीन वर्षीचें वासरूं द्यावें. २७१ हंस, श्येन ( ससाणा), वानर, व्याघ्रादि हिंसक पशु, पाण्यांत राहणारा पक्षी, ज मिनीवरचा पक्षी, मोर, किंवा कोंबडा मारल्यास एक गोदान करावें. मांस न खाणारें [ इत- र] जनावर मारल्यास एक पाडी द्यावी. २७२ साप मारल्यास [ प्रायश्चित्तार्थ ] लोखंडी काठी (काठीचे आकारमानाचें लोखंड) द्यावी; हिजड्याचा वध केल्यास कथील व शिलें यांचें दान द्यावें; रानडुक्कर मारल्यास तुपानें भरलेले भांडें दान द्यावें; उंट मारल्यास गुंजा द्याव्या; अथवा घोडा मारल्यास वस्त्र- दान करावें. २७३

तित्तिर पक्ष्यास मारल्यास द्रोण (संजक माप) भर तिलदान करावें ; आणि गंज व- गैरे जनावरें मारल्यास [ योग्य ] दानें करण्यास सामर्थ्य नसल्यास [ मारलेले ] प्रत्येक जनावराबद्दल कृच्छ्रप्रायश्चित्त करावें. २७४ फळांत, फुलांत, अन्नांत किंवा रसांत सांपडलेला किडा मारल्यास अपराधी पुरुषानें घृतप्राशन करावें. हार्डे असलेले क्षुद्र जंतुजातीस मारल्यास स्वल्प किंमतीच्या वस्तूचें दान द्यावें ; व हाड नसलेले प्राण्यास मारल्यास प्राणायाम करावा. २७५ वृक्ष, जाळी, वेल, किंवा झुडुप कापणारानें शंभर वेदऋचांचा जप करावा. १३ .