पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ याज्ञवल्क्यस्मृति. लेले प्रायश्चित्त करील, किंवा आपल्या भारंभार सोन्याचें दान करील, किंवा ब्राह्मणास सं- तोष होई इतकें सोनें देईल, तर तो दोषमुक्त होईल. गुरुपत्नीशी गमन केल्याबद्दल प्रायश्चित्त. २५८ ज्यानें स्वगुरुपत्नीशी गमन केलें असेल त्यानें तापलेले लोखंडावर लोखंडाची स्त्री- प्रतिमा बरोबर घेऊन निजावें, अथवा त्यानें आपले वृषण कापून आपले हातीं घेऊन आप- ला देह नैर्ऋती दिशेस टाकावा ह्यणजे प्रायश्चित्त झाले; २९९ अथवा [ गुरुपत्नीगमन करणारानें ] • तीन वर्षेपावेतों प्राजापत्यकृच्छ्र करावें ; किंवा तीन महिने चांद्रायणे करावी व वेदसंहितापाठ करावा. संसर्गापासून झालेले पापाबद्दलचे प्रायश्चित्त. २६० या [ वर लिहिलेल्या पाप्यांशीं ] जो एक वर्षभर समागम करील तो त्यांचे सार - खाच होईल. या पाप्यांपैकी कोणाचीही कन्या वरण्यास प्रत्यवाय नाहीं. परंतु [ प्रा- यश्चित्तार्थ ] तिर्ने पहिल्यानें उपवास केले पाहिजेत; व तिनें [ आईबापांकडील ] कांहीं एक बरोबर घेऊं नये. २६१ अवकृष्टाचा (नीचजातिपुरुषाचा ) वध केल्यास [ अपराध्यानें ] सर्व चांद्रायण- व्रतें करावीं. [शास्त्रोक्तविधीनें प्रायश्चित्तें करण्याचा ] अधिकार शूद्रास नाहीं, तरी इत- क्या (सर्व चांद्रायणव्रतें करण्यास लागणारे) काळानें तोही शुद्ध होईल. उपपातकांबद्दल प्रायश्चित्ते. २६२ गोवध करणारा जर एक महिनाभर पंचगव्य प्राशन करून राहील, [ दरम्यान ] स्त्रीसंग वर्ज करून गाईंचे गोठ्यांत राहील, व [ गाय जाईल त्याप्रमाणे ] तिचे पाठीमागून जाऊन [ महिन्याचे शेवटीं ] गोप्रदान देईल, तर तो शुद्ध होईल; २६३ किंवा शुद्ध अंतःकरणानें कृच्छू किंवा अतिकृच्छ्र व्रत तो करील तर ; अथवा तीन दिवस उपोषण करून दहा गाई व एक वृषभ दान देईल तर [ तो दोषमुक्त होईल ] . २६४ [ हे वर उपाय सांगितले ] यांनी उपपातकांपासून शुद्धि होते, किंवा चांद्रायण - व्रत केल्यानें, एक महिना दूध पिऊन राहिल्यानें, किंवा पराक ( बारा दिवस उपोषण ) केल्यानें [ उपपातकांपासून शुद्धि होते ] . २६५ क्षत्रियाचा वध केला असल्यास [ वध करणारानें ] एक हजार गाई व एक वृष यांचें दान करावें ; किंवा ब्रह्महत्या करणारास जें प्रायश्चित्त सांगितलेले आहे तें तीन वर्षे - पावतों करावें. २६६