पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. किंवा सरस्वती नदी व तिची प्रत्येक शाखा यांस स्वल्प आहार करीत प्रदक्षिणा केल्यानें पवित्र होतो; २४९ अथवा योग्य ब्राह्मणास पुष्कळ ( यथेच्छ ) द्रव्यदान केल्याने तो पापापासून शुद्ध होतो. असें द्रव्य घेणाराने स्वतः आपल्या शुद्धीसाठों वैश्वानरी इष्टि करावी असें सां- गितलेले आहे. २५० क्षत्रियास किंवा वैश्यास तो यागकर्म करीत असतांना ठार मारलेले असल्यास मारणारानें ब्रह्महत्यापातक करणारास जीं प्रायश्चित्तें सांगितलेली आहेत ती करावी. गर्भ- घात करणाराने व ऋतुमती स्त्रीचा घात करणाऱ्यानें त्याचप्रमाणे ( तिच्या जातीस अनुस- रून ), प्रायश्चित्त करावें. २५१ प्राणघात करण्याचा यत्न केला असून प्राणवात न घडला तरी असा यत्न करणा- राने प्रायश्चित्त करावें. [ ब्रह्महत्यापातक करणारास जें साधारणतः प्रायश्चित्त सांगि- तलेले आहे त्याचे ] दुप्पट प्रायश्चित्त यज्ञक्रिया करीत असलेले ब्राह्मणाचा वध करणारानें करावे. सुरापानप्रायश्चित्त. २५२ आगीसारखी जळजळीत दारू, पाणी, तूप, गोमूत्र किंवा दूध पिऊन ठार मरण्यानें सुरापान करणाराची शुद्धि होते. २५३ लोकरीचीं वस्त्रे पांघरून व जटा वाढवून दारू पिणारानें आपल्या शुद्धीसाठीं जें प्रायश्चित्त ब्रह्महत्या करणारास सांगितलेलें आहे तें करावें; अथवा तीन वर्षेपावेतों तिळा- ची पेंड किंवा धान्याचे फुटके कण रात्री खाऊन राहून [ शुद्धि करून घ्यावी. ] २५४ अज्ञानार्ने दारू प्याली असेल, किंवा रेत, पुरीष किंवा मूत्र गिळलें गेलें असेल, तर तीन वर्णांचे द्विजाती (ब्राह्मण, वैश्य, शूद्र ) यांचा पुनःसंस्कार केला पाहिजे. २९५ जी ब्राह्मणस्त्री सुरापान करील ती आपल्या पतीचे [ उच्च ] लोकास जाणार नाहीं, आणि ती या लोकी कुत्री, गिधाडी, किंवा डुकरी यांचे जन्मास येईल. स्वर्ण चोरल्याबद्दलचें प्रायश्चित्त. २१६ ज्या ब्राह्मणानें सोनें चोरिलें असेल त्यानें राजाजवळ आपला अपराध कबूल करून मुसळ [ आणून ] द्यावें. [ राजानें त्या मुसळानें ] त्यास मारिलें ह्मणजे किंवा [ शिक्षा न करतां] सोडलें ह्मणजे तो ब्राह्मण दोषमुक्त झाला. २५७ [ आपला अपराध ] राजापाशीं कबूल न करतां जर तो ब्राह्मण मद्यप्यास सांगित-