पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. तिच्याशीं समागम ठेवणे, वेदाचें अध्ययन टाकणें, अग्नीची सेवा सोडणें, आपले पुत्र क बंधुजन यांचा त्याग करणें, २३९ [ केवळ ] सर्पणासाठी झाडें तोडणें, स्वस्त्रीकडून व्यभिचार करवून त्याचे उत्प- न्नावर, खाटकाचे धंद्यावर, व गारुड विद्येने औषवींचा उपयोग करून त्याचे उत्पन्नावर निर्वाह करणें, तीळ, ऊंस वगैरेचीं यंत्रे चालविणें, दुर्व्यसनांत निमग्न राहणें, स्वतःस विकणें, २४० शूद्राची चाकरी करणें, नीचजातिपुरुषाशीं सख्य करणें, सवर्णेशी विवाह न करितां हीनवर्णेशीं विवाह करणें, किंवा वेश्यागमन करणें, चार आश्रमांपैकी कोणत्याही आश्रमांत न राहणे, परान्न खाऊन पुष्ट होणें, २४१ असच्छास्त्रांचें ( नास्तिक्यप्रतिपादक शास्त्राचें) अध्ययन करणें, [ सोनें, रुपें 1 वगैरेचे खाणीवर देखरेखीचें काम करणे, व आपली स्त्री विकर्णे, हीं प्रत्येकी उपपातकें होत. २४२ ब्राह्मणाचा वध करणारानें बारा वर्षेपावेतों मनुष्याचें डोकें [ काठीस लावून ], निशाणाप्रमाणे आपल्या डोक्यावर धरून, भिक्षेवर निर्वाह करून, आपला अपराध सर्वांस विदित करीत व स्वल्प अन्न खाऊन राहिल्यास तो दोषमुक्त होतो; २४३ किंवा, एका ब्राह्मणाचा अथवा बारा गाईंचा जीव वांचविल्यानें; किंवा अश्वमे- धार्चे (ह्मणजे अश्वमेधसंज्ञक यज्ञ केल्यावर होणारें ) अवभृथस्नान ( यज्ञकर्ता यज्ञ आटोपल्यावर नदीत स्नान करतो त्यासमागमें स्नान करणें तें ) करील, तर तो दोषमुक्त होईल; २४४ किंवा, मार्गस्थ ब्राह्मणास किंवा गाईस झालेल्या एकाद्या नेहेमी इजा देणाऱ्या व्याधीपासून ब्रह्महत्या करणारा मुक्त करील तर तो दोषमुक्त होईल; २४५ किंवा, चोरीस गेलेली ब्राह्मणाची मालमत्ता परत आणून ज्याची त्यास देववील तर, अथवा तसा यत्न करीत असतां तो प्राणास मुकेल तर, अथवा तशा यत्नांत जरी ठार मेला नाही तरी जर तो शस्त्रानें घायाळ होईल तर [ तो दोषमुक्त होईल ]; २४६ ‘लोमभ्यः स्वाहा' या मंत्रानें व त्याने पुढील मंत्रांनी अनुक्रमानें लोमा- पासून आरंभ करून मज्जेपावेतों आपले शरिराचे सर्व अंगांचा होम [ ब्रह्महत्या कर णारानें ] आपल्या पापशुद्धीसाठी करावा; अथवा, २४७ अथवा, युद्धप्रसंगांत [ बाणादिकांनीं ] विद्ध होत्साता आपला प्राण सोडून किंवा ठार न मरतां जखमांच्या वेदना सहन करून, त्याने आपली पापशुद्धि करून घ्यावी; २४८ अथवा वनांत राहून, थोडा आहार करून, वेदाच्या संहितेचा जप तीन वेळ केल्यानें,