पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रायश्चित्ताध्याय. निषिद्ध पदार्थ खाणे, विश्वासघात करणे, व्यावहारिक हित करून घेण्यासाठी अ सत्य बोलणें, आणि रजस्वला स्त्रीचे मुखाचें चुंबन घेणें, हीं पातकें सुरापानाचे योग्यतेचीं जाणावीं. AN २२९ घोडा, दागिने, पुरुष, स्त्री, जमीन, गाय, व ठेव हीं हक्क नसतां स्वतःचे उपयोगास लावणे, हीं पातकें सोनें चोरण्याचे पातकाशी तुल्य समजावीं. २३० स्नेह्यांच्या स्त्रियांशीं, [ चांगल्या कुळांतल्या ] अविवाहित स्त्रियांशीं, बहिणीशीं, नीच जातीच्या स्त्रियांशी, आपल्याच गोत्रांतील स्त्रियांशीं आणि सुनांशीं संभोग करणें, हीं पातकें आपल्या गुरूच्या पत्नीशीं गमन केल्याचे पातकाशीं सम होत. २३१ जो आपल्या आतेशीं, मावशीशी, मामीशीं, सुनेशीं, सावत्र आईशीं, बहिणीशीं, आचार्याच्या कन्येशी [ जारकर्म करील ]; २३२ [ तसेंच जो ] आपल्या आचार्याच्या पत्नीशी किंवा आपल्याच कन्येशी जारकर्म करील, तो गुरुतल्प ( गुरुपत्नीशीं जारकर्म करणारा ) समजावा. [ अशा अपराधी ] पुरुषाचें इंद्रिय कापून टाकून त्याचा वध कंरावा. [ वर सांगितलेल्या ] स्त्रियांशीं जर त्यांच्या कामवासनेनें जारकर्म झालेले असेल, तर त्या स्त्रियांसही तीच शिक्षा. २३३ गोवध करणें, योग्य काळीं शास्त्रोक्त [ उपनयनादिक ] संस्कार न करणें, चोरी करणें, घेतलेलें कर्ज न फेडणें, [ शास्त्रानें ] जे अग्नि राखण्यास सांगितलेले आहेत ते न राखणें, न विकण्याचे जिन्नस विकणें, वडिलापूर्वी धाकटे भावाचें लग्न करणें, २३४ दरमहानें गुरु ठेवून त्यापासून वेद शिकणें, पैसा घेऊन वेद शिकविणें, व्यभिचार, लहान भावाचें लग्न झाले असूनही वडिलाचें लग्न न करणें, फार व्याज घेणें, मीठ उत्पन्न करणे, २३५ स्त्री, शूद्र, वैश्य, किंवा क्षत्रिय यांचा वध करणें, निंदित द्रव्यावर उपजीविका क- रणे, नास्तिकपणा, [ ब्रह्मचान्यानें ब्रह्मचर्य - ] व्रताचा भंग करणें, आपलींच अपत्यें विकर्णे, धान्य, सोनें,व रुपें यांशिवाय सर्व धातु, व पशु ही चोरणें, यजनक्रिया करण्यास अधिकार नसलेल्या पुरुषाचे घरीं यज्ञयाग करणें, पिता, माता, किंवा पुत्र यांस निराश्रित सोडणें, तलाव किंवा बगीचा विकणे, २३७ कन्येचें अंगुल्यादिकांनी इंद्रिय विदारण करणे, आपल्या वडील भावाचें लग्न हो- ण्यापूर्वी लग्न केलेले पुरुषासाठी यजनक्रिया करणें, वडील भावाचें लग्न झालेले नसतां त्याचे लहान भावास मुलगी देणे, विश्वासघात करणें, केलेले नवस न फेडणें ( संकल्प केल्याप्रमाणें न चालणें ), २३८ आप्रणासाठींच एकादें काम (पाककर्म ) करणें, स्वस्त्री मद्यपी झालेली असतां