पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. ( ३७. ) पूर्वी सगोत्रांचा विवाह होत नाहीं अर्से सांगितले आहे. ब्राह्मणांचीं गोत्रें अनेक आहेत, व प्रवर ४९ आहेत. ३८ 34 क्षत्रिय व वैश्य यांच्या गोत्रांविषयी पुढे सांगितले आहे. नाहीं; परंतु श्राद्धाच्या ठायीं मात्र त्यानें काश्यप गोत्र लावावें असें सांगितलेलें आहे. शूद्रास गोत्र ४० ( ३८.) जसा पुरुषास उपनयनसंस्कार आवश्यक तसा स्त्रियांस विवाह होय. पुरुषांचा विवाह हा संस्कार इच्छाधीन आहे तसा स्त्रियांस नाहीं. ही गोष्ट परदेशीय न्यायकर्त्यांनी विशेष लक्षांत ठेवण्याजोगी आहे. त्या गोष्टीच्या अज्ञानामुळे न्यायांत घोंटाळा झाल्याची उदाहरणें आढळांत येत आहेत. वारशाच्या संबंधानें मृताची विधवा जन्मवेडी होती की नाहीं असा प्रश्न निवाला असतां एका न्यायाधीशाने तिचे लग्न झालें होतें यावरून ती तेव्हां वेडी नसावी असे अनुमान करून कज्याचा निकाल केला. हिंदूंत व्रात्यत्वाचा दोष टाळण्यासाठी मुलगी कशीही असेल तरी तिचा विवाह केला पाहिजे असें आहे, ही गोष्ट ज्यांच्या चित्तांत वागत असेल, तो विवाह झाला इतक्यावरून कांही एक अनुमानें न करितां, त्या स्त्रीच्या लग्नकाळच्या स्थितीविषयीं विवाद असेल तर पुराव्यांची अपेक्षा घरीलच घरील. अलाहाबाद हाय कोर्टानें अटलें आहे कीं, हिंदूतील विवाहास अनुमतीची अपेक्षा नाहीं; बाल्यावस्था व असामर्थ्य यांनी विवाहास प्रत्यवाय येत नाहीं; कारण त्याला कराराचें स्वरूप नाहीं. ४१ ( ३९. ) विवाहापासून पति व पत्नी या उभयतांसही दिवाणी कोर्टे फैसल करूं शकतील असे हक्क उत्पन्न होतात. ते असे :- विवाहानंतर स्त्रीनें पतिगृहीं नांदलें - पा- हिजे. ती तसें न करील तर पति त्याबद्दल फिर्याद करूं शकतो, आणखी प्रसंगवि- शेषीं भार्येचें स्त्रीधन तिच्या हयातीत वापरण्याचा व तिच्या मरणानंतर वारशानें घेण्याचा हक्क नवयास विवाहापासून प्राप्त होतो. त्याप्रमाणेंच भर्त्याकडून व त्याच्या मिळकतीं- तून पोषण, व त्याच्या मरणानंतर प्रसंगविशेषीं वारशाने त्याचें धन घेणें, हे दोन हक्क भार्येला विवाहानें येतात. यांविषयीं विस्तारानें पुढे लिहितों. ( ४०. ) ही गोष्ट निर्विवाद आहे की, आपल्या स्त्रीनें घरीं नांदावें असा हुकुम, ३८. निर्णयसिन्धु परिच्छेद २ रा, पत्र २७, पृ. २, व संस्कारकौस्तुभ पहा. ३९. पुढें कलम ७२ पहा. ४०. शूद्रकमलाकर, चौल प्रकरण, पत्र १३ पृ० १ पंक्ति ५।६. ४१. देवकिशन वि. बुधप्रकाश, इं. ला. रि. ५ अ. प ५१३ पद्दा. ५