पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ याज्ञवल्क्यस्मृति. घेऊन [ ते पुरुष ] महत् सुखांचा उपभोग घेणारे, कलाकौशल्य व शास्त्रं जाणणारे, व द्रव्यवान् असे होतात. २१८ जें अवश्य करावें ह्मणून सांगितलेलें आहे तें न केल्याने, व जें निंद्य [ ह्मणून करूं नये असे सांगितलेले आहे ] तें केल्याने, व आपल्या इंद्रियांस स्वाधीन न ठेवल्यानें मनुष्य आपल्या अवस्थेपासून भ्रष्ट होतो. २१९ यासाठी शुद्धता राहण्याकरितां या जगांत मनुष्यानें प्रायश्चित्त केलें पाहिजे. असें केल्यापासून करणाराचें अंतःकरण व लोक संतुष्ट होतात. २२० पापकर्मे करण्यांत निमग्न असून जे पश्चात्तापी होत नाहींत व प्रायश्चित्त कर्मेंही करीत नाहींत, ते अत्यंत दुःख देणाऱ्या भयंकर नरकास जातात. २२१ [ते नरक'] तामिस्र ( जेथें अंधार आहे ), लोहशंकु . ( जेथें लोखंडाचे सुळे पा- तक्यांचे अंगांस टोचतात ), महानिरय ( मोठा नरक ), शाल्मली (ज्यांत शेवरीचे कांटे पातक्यांचे अंगास बोंचतात ), रौरव ( भयंकर नरक ), कुड्मल, पूतिमृत्तिक ( दुर्गंधी मातीने भरलेला ), कालसूत्रक, २२२ संघात (मांसमय द्रव्याने भरलेला ), लोहितोद ( रक्ताने भरलेला ), सविष (वि- षानें भरलेला), संप्रतान ( अणकुचीदार दगडांनी भरलेला ), महानरक ( अत्यंत खोल नरक ), काकोल (ज्यांत विषारी साप आहेत ), संजीवनमहापथ, २२३ अवीचि, अंधतामिस्र ( ज्यांत अगदीं अंधार आहे ), कुंभीपाक ( मातीच्या घागरी भट्टीत भाजतात तसें पापी लोकांस जेथें भाजतात ), असिपत्रवन ( नागव्या तर- वारींनी भरलेला ), आणि एकविसावा नरक तापन ( ज्यांत पापी भाजत अशी उष्णता आहे ). [ केलेली ] महापातकें आणि उपपातकें यांचेपासून होणारी फळें ( दुःखें ) भो- गीत असूनही जे [ पातकी लोक ] प्रायश्चित्तें करणार नाहींत ते [ या वर सांगितलेले ] नरकांस जातील. २२४ २२५ पातक अज्ञानामुळे घडेल तर मात्र प्रायश्चित्तानें दूर होतें. पण समजून उमजून ( ह्मणजे कांही हेतूनें ) पाप करणारे पुरुषानें प्रायश्चित्त केल्यानें त्याच्याशी लौकिक व्यवहार [ स्मृतींचे किंवा वेदांचे ] वचनाचे आधाराने होतात. २२६ ब्राह्मणाचा वध करणारा, मद्यपी, वोर, आणि आपल्या गुरूच्या पत्नीशीं गमन कर- णारा, यांस महापातकी ह्मणतात. यांच्या समागमानें जो राहतो तोही तसाच. २२७ आपल्या वडील माणसांचा अपमान होण्याजोगें अयोग्य भाषण करणे, वेदांची निंदा करणें, स्नेह्माचा वध करणें, व [ वेदादिकांचें ] केलेलें अध्ययन विसरून जाणें, हीं पातकें ब्रह्महत्येच्या पातकाशी समान समजावीं. २२८