पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ९१ येतो व मद्यपी, गर्दभ, पुल्कस ( चांडालांतील अत्यंत नीच वर्ग), आणि वेण (एक मिश्र जाति ), यांचे जन्मास जातो. २०७ सोने चोरणारा हा किडा, कीटक, आणि पतंग यांचे जन्मास जातो, व गुरुपत्नी- गमन करतो तो अनुक्रमानें गवत, झुडूप, व वेल यांचे जन्मास जातो. २०८ ब्राह्मणाचा प्राण घेणारा क्षयरोगी होतो. मद्यप्याचे दांत काळे होतात. सोनें चोर- णाराची नखे विद्रूप होतात. गुरुपत्नीगमन करणाराच्या अंगाची त्वचा नासून जाते. २०९ अशा पापकर्मी पुरुषांशीं जो सहवास करील त्याला त्या पापी पुरुषासारखेच दोष प्राप्त होतील. तयार केलेले अन्न जो चोरतो त्यास अग्निमांद्याचा रोग होतो, व पोथी पुस्तक घोरतो तो मुका होतो. २१० धान्यांत मिसळ करून [ विकतो ] त्याची अंगुल्यादि अवयवसंख्या अधिक होते; लोकांची निंदा करणाराचे ( ह्मणजे लोकांबद्दल वाईट बोलणाराचे ) नाक कुजतें; तेल चोरणारा तैलपायी ( नांवाचा किडा) होतो; व खोडसाळपणानें [ चांगल्या माणसावर ] आरोप आणणाराचें तोंड दुर्गंधी होतें. २११ दुसऱ्याची पत्नी जो फुसलावून नेतो तो व ब्राह्मणाचें द्रव्य चोरतो तो ब्रह्मराक्षस होऊन जेथें कोणी माणूस राहत नाहीं अशा भयंकर रानांत राहतो. २१२ दुसऱ्याचे दागिने चोरतो तो नीच जातीचे जनावराचे जन्मास जातो; पालेभाजी चोरतो तो मोर होतो; व सुगंधी द्रव्यें चोरतो तो चिचुंद्रीचे जन्मास जातो. २१३ धान्य चोरणारा उंदीर होतो; वाहन चोरणारा उंट होतो; फळें चोरणारा वानर होतो; पाणी चोरणारा बदक होतो; दुब चोरणारा कावळयाचे जन्मास जातो; घरांतील संसाराच्या जिनसा चोरतो तो गांधीलमाशीचे जन्मास जातो; २१४ मंत्र चोरणारा काजवा होतो; मांस चोरणारा गिवाडपक्षी होतो; गाय चोरणारा पालीचे जन्मास जातो; विस्तव चोरणारा बगळा पक्षी होतो; वस्त्र चोरणारा शुभ्रकुष्टी होतो; रस चोरणारा कुत्र्याचे जन्मास जातो; व मीठ चोरणारा चौरी ( नांवाचा किडा ) होतो. हे प्रकार मी सांगितले ते केवळ चौर्यकर्माचे जसे अनेक प्रकारचे पदार्थ चोरले जातात, तसेच ज्या योनी प्राप्त होतात ] ते प्राणीही अनेक आहेत. २१५ परिणामांचीं कांहीं उदाहरणे होते. [ चौर्यकर्माबद्दल शिक्षा ह्मणून ज्या २१६ केलेल्या कर्माप्रमाणे त्यांची योग्य फळें पावून ( शिक्षा भोगून), त्यापुढे निरनि- राळे नीच जातींचे प्राण्यांचे जन्म घेऊन [ शेवटीं पातकी पुरुष हस्तपादादिकांच्या ] व्यं. गांनिशीं अत्यंत दुःखद स्थितीत मनुष्याचे अति नीच जातीत जन्म घेतात २१७ पुढें-सर्व पापांपासून मुक्त झाल्यावर [कांहीं पुण्यशेषामुळें ] उंच कुळांत जन्म