पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याज्ञवल्क्यस्मृति. ज्यास ज्ञानशक्ति असून [ उत्तम लोकप्राप्तीचे ] हे दोन मार्ग समजत नाहीत ( ह्मणजे सामर्थ्य असून हे लोक मिळवीत नाहीं ), तो सर्पाचे, पतंगाचे, कीटकाचे, किंव कृमीचे जन्मास जातो. १९७ पायांचे तळवे वर येत अशा रीतीनें पाय मांडीवर चढवून, आसनमांडी घालून, डाव्या हातावर उजवा हात उताणा ठेवून, तोंड किंचित् वर करून, छाती ताठ करून, १९८ डोळे झांकून, अंतःकरण शांत ठेवून, वरचे व खालचे दांत एकमेकांस न लागूं देतां, जिभेचा शेंडा टाळूवर स्थिर ठेवून, तोंड मिटून, न हालत, १९९ सर्व इंद्रियांचा निग्रह करून, फार उंच किंवा फार सखल नाहीं अशा आसनावर बसून पुरुषाने दोन किंवा तीन वेळ प्राणायाम ( प्राणसंज्ञकवायूचा अवरोध करून स्तब्ध राहाणें ) करावा. · . २०० याप्रमाणे [ प्राणायाम ] करून अंतःकरणांत दीपाप्रमाणें बसलेला जो सर्वशक्ति- मान् पुरुष त्याचें ध्यान करावे आणि धारणा करून ( तीन प्राणायामांस जो काळ लागतो तोंपावेतों श्वासोच्छ्रास बंद करून ), आत्म्याचा विचार करावा. २०१ अदृष्ट होण्याचे सामर्थ्य, (जन्मांतरी पाहिलेल्या गोष्टींची ) स्मृति, उत्तम कांति,, [ दूरचे पदार्थाचें ] ज्ञान, [ फार दूर झालेला ] ध्वनि ऐकण्याचे सामर्थ्य, आपले शरीर टाकून, दुसऱ्याचे शरिरांत प्रवेश करण्याचे सामर्थ्य, २०२ [ आणि हवे तसे पदार्थ उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ] प्राप्त होणें हीं योगसिद्धि झाल्याची लक्षणे होत. योगसिद्धि करून घेतल्यावर जो देहत्याग करतो तो मोक्ष प्राप्त होण्यास योग्य होतो. २०३. अथवा, वेदाचा अभ्यास करून, निषिद्ध कर्मांचा परित्याग करून, वनांत राहून, अयाचितवृत्तीने मिळेल त्यावर उपजीवन करून, [आणि] परिमित अन्न खाऊन, मनुष्य परमसिद्धि (जन्मास आल्याचे सार्थक ) मिळवू शकतो. २०४ गृहस्थाश्रमांत असूनही जो न्यायाने द्रव्य संपादन करून तत्वज्ञानप्राप्ति करून घेण्यास जो तत्परतेनें यत्न करील, अतिथीचें आदरातिथ्य करील, पितरांचे श्राद्धकर्म करील, व सत्य भाषण नेहेमीं बोलेल, तो [ संसारापासून ] मुक्त होतो. ब्रह्महत्याप्रायश्चित्तप्रकरण. २०५ ब्रह्महत्यादि पंचमहापातकें केल्यामुळे प्राप्त झालेले भयंकर व दारुण नरकांत [ को- डलेले ] राहून बहुतेक कर्मक्षय झाल्यानंतर महापातकी पुरुष [ कांहीं कर्मशेषानें, ]. या जगांत जन्मास येतात. २०६ ब्राह्मणास ठार मारणारा पुरुष खचीत मृग, कुत्रा, डुक्कर, आणि उंट यांचे जन्मास