पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ८९ अजवीथि ( देवांचा मार्ग ) व अगस्तीचें स्थान यांचेमधील जो प्रदेश तो पित- रांचा मार्ग होय. स्वर्गप्राप्ति व्हावी ह्मणून इच्छा करणारे अग्निहोत्री ( यज्ञयागकर्ते ) त्या पितृमार्गानें स्वर्गास जातात. १८४ जे [ नेहेमी ] दानतत्पर राहतात, जे (दया, क्षमादि ) आठ गुणांनीं संपन्न अस- तात, सत्यानें चालावं हें ज्यांचें व्रत असतें, ते त्याच मार्गानें [ स्वर्गास जातात ]. १८९ गृहस्थाश्रममने चालणारे अठ्यायशी (८८०००) हजार ऋषि तेथें राहतात. हे पुनः कर्मभूमीवर येणारे असून हे धर्माचें मूळ होत, व [ प्रत्येक युगाचे आरंभी अ- ग्निहोत्रादिक ] धर्मप्रवृत्ति करणारे हेच. १८६ सात ऋषींचें स्थान व नागवीथि ( हस्तिमार्ग ) यांचेमधील देवलोकांत राहणारे व सर्वकर्मपरित्याग केलेले असे. तितकेच ( ह्मणजे अध्यायशी हजार ) ऋषि आहेत. १८७ तापसी वृत्ति, ब्रह्मचर्य, सर्वसंगपरित्याग, व बुद्धिसामर्थ्य यांचे बलाने ते ऋषि त्याच ठिकाणी प्रलयकालपावेतों राहतात (ते आध्यात्मिक धर्माची प्रवृत्ति करितात ). १८८ वेद, पुराणें, विद्या, उपनिषदें, वृत्तबद्ध ग्रंथ, सूत्रे, भाष्यें, आणि आयुर्वेद, धनुर्वेदा- दि जें वाङ्मय हीं या [ दोन प्रकारच्या ] ऋषींपासून प्रवृत्त झाली आहेत. १८९ वेदानुवचन (वेदपठण), यज्ञकर्मे, ब्रह्मचर्यवृत्ति, तपश्चर्या, दम ( सर्व शारीर व मान- सिक धर्म आपल्या शक्तोखाली ठेवण्याचें सामर्थ्य), श्रद्धा ( आस्तिक्यबुद्धि ), उपवाग, आणि स्वातंत्र्य ही आत्मज्ञानप्राप्तीची कारणें होत. १९० सर्व आश्रमांत (ब्रह्मचर्यादिकांत ) असतांना त्या आत्म्याचें ज्ञान प्राप्त करून घे- ण्यासाठी यत्न करावाच. [ उपनिषदांत त्यांचे स्वरूप - ] वर्णन आहे तें द्विजातीनी ऐकावें, त्याचें ध्यान करावें, व [ परिणाम ] त्याचें प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यावें. परम आस्तिक्यबुद्धियुक्त निर्जन प्रदेशस्थित होऊन सत्यरूपी द्विज उपासना करतात, ते त्या आत्म्याच्या स्वरूपाला पावतात. रायण, १९१ परमेश्वराची जे १९२ [ अशा रीतीनें आत्मज्ञानाची प्राप्ति झाली ह्मणजे] अग्नि, दिवस, शुक्लपक्ष, उत्त- देवलोक, सूर्य व विद्युलता इतक्या देवतांच्या स्थानीं क्रमेंकरून विसावा घेत घेत प्राप्त होतात. १९३ नंतर तो सर्वांतर्यामी पुरुष त्यांचे [ आदरसत्कारासाठीं ] सामोरा येऊन त्यांस ब्रह्म- लोकवासी करतो. असें झालें ह्मणजे त्यापुढे त्यांस या जगांत [पुनः जन्म नाहीं ]. १९४ यज्ञयागादिकमें, तपश्चर्या, व दाने यांचे योगानें ज्यांनी स्वर्गप्राप्ति करून घेतली, ते पुरुष धूम, रात्रि, कृष्णपक्ष, दक्षिणायन, १९९ पितृलोक, चंद्रलोकापर्यंत [ वर जाऊन ] पुनः उलट वायु, वृष्टि, जल व पृथ्वी यांप्रत क्रमाने प्राप्त होतात; व ते पुनः या पृथ्वीवर जन्म घेतात. १२ १९६