पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ याज्ञवल्क्यस्मृति. ग्रह व नक्षत्रे यांच्या गति, मनुष्याची जागृत काळची चंचल स्थिति व निद्रावस्था, आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी आणि अंधकार, १७२ मन्वंतरें (या संज्ञेचे काळ), युगांतरें, व मंत्र आणि ओषधि यांपासून होणारे प- रिणाम; यांवरून असें समज कीं, आत्मा विद्यमान् आहे, आणि तो जगदुत्पत्तीला का- रणीभूत होय. १७३ अहंकार ( मी विद्यमान् आहें असें ज्याचे त्यास ज्ञान असतें तें ), स्मृति, मेधा ( धारणाशक्ति), द्वेष, बुद्धि, सुख, धैर्य, अनेक इंद्रियद्वारा [ एका वस्तूचें ] ज्ञान, इच्छा, शरिराची सजीव स्थिति, प्राण, १७४ आकाश, स्वप्ने, ज्ञानेंद्रियाची प्रेरणा, मनाची प्रेरणा किंवा गति, डोळ्यांची उघड- मीट, चेतनेपासून होणारे यत्न, व पंचमहाभूतांशी योग; १७५ ही सर्व परमात्म्याची ( परमात्म्याच्या अस्तित्वाची ) दर्शक चिन्हें होत; यांवरून शरिराहून भिन्नपणें वस्तुमात्रांत राहणारा व वस्तुमात्रांस स्वेच्छेने चालविणारा परमात्मा विद्यमान आहे. १७६ बुद्धींद्रियें (जेणेंकरून ज्ञान होते तीं ) व त्यांचे विषय, मन व कर्मेंद्रियें, अहंकार, बुद्धि, पृथ्वी आदिकरून पंचमहाभूतें, १७७ व प्रकृति हीं सर्व मिळून जें हैं (शरीर ) होतें त्यास क्षेत्र ही संज्ञा व त्यांतील आत्म्यास क्षेत्रज्ञ अशी संज्ञा आहे. हा आत्मा सर्वशक्तिमान् असून सर्व वस्तुमात्रांत व्यापक आहे व तो सत् (सर्वकाल विद्यमान् ) व असत् (विद्यमान् असूनही अप्रत्यक्ष ) या दोन्ही प्रकारचा आहे ह्मणून तो सदसद्रूप आहे. १७८ आत्म्याचे अव्यक्त बीजापासून बुद्धीची उत्पत्ति झाली, बुद्धीपासून अहंकार उत्पन्न झाला, व मागल्यापेक्षां उत्तरोत्तर पुढल्यांत एक एक गुग जास्ती आहे अशी सूक्ष्म पंच- महाभूतें [ व स्थूल पंचमहाभूतें] अहंकारापासून उत्पन्न झाली. १७९ शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध हे [स्थूल पंचमहाभूतांचे ] गुण होत. यांपैकी जो ज्यापासून आरंभी उत्पन्न झाला त्यांत तो परिणामी जाऊन मिळतो. १८० आत्मा शक्तिमान् असूनही तीन प्रकारच्या कर्मांच्या विपाकानुरूप ( परिणामा- १८१ प्रमाणें ) आपणास कसा उत्पन्न करतो तें मी आपणांस सांगितलें. सत्त्व, रज व तम हे त्याच [ सर्व शक्तिमान् आत्म्याचे ]' गुण होत असें सांगित- लेले आहे. रजोगुण व तमोगुण यांत शिरून ( ह्मणजे ह्या दोहोंचा स्वीकार करून ). हा आत्मा चक्राप्रमाणें भ्रमण करतो. १८२ तोच परमपुरुषं अनादि असूनही आदिमान् होतो. असा हा परमपुरुष अनेक स्वरूपें धारण केलेला [पूर्वोक्त] लिंगे ( चिन्हें ) व ज्ञानेंद्रियें यांचे द्वारें गोचर होतो. १८३