पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ८७ कारणीभूत ] कर्माचे हेतु नाहींसे केल्याने, व सत्संगाचे योगानें [ प्राणिमात्राचे शारीर-. आत्म्याचे परमात्म्याशीं ] तादात्म्य होतं. १६० शरिराचा नाश होण्याचे ( मरण्याचे) वेळेस अंतःकरण सत्वगुणयुक्त राहून ईश्वराचे ठायीं लीन होईल [ तर अशा पुरुषाचें ] हृदय अज्ञानरूपांधकारापासून वियुक्त होऊन त्याला त्याच्या पूर्व जन्माचें स्मरण होईल. १६१ बहुरूपी जसा आपले शरीर निरनिराळ्या रंगांनी रंगवून अनेक सांगें दाखवितो, तसे आपल्या कर्माप्रमाणें प्राप्त होणाऱ्या निरनिराळ्या आकाराच्या शरिरांत आत्मा शिरतो. १६२ जन्मापासूनच कांही मुलांस एकादा अवयवच नसणें इत्यादिक शरीरव्यंगे असतात त्यास कारणें ह्यटलीं ह्मणजे जन्माचा काल, त्यांचीं [ पूर्वजन्मींची कर्मे ], व पुरुषाचें रेत किंवा मातेचे दोष [ हीं होत]. १६३ मोक्षप्राप्तीपूर्वी, अहंकार, मन, पुनः पुनः जन्ममृत्यु, कर्मविपाक (ह्मणजे कर्मापासून होणारे परिणाम ) आणि [ लिंग ] शरीर यांपासून आत्मा मोकळा होत नाहीं. १६४ वात, आधार, व तेल यांचा योग जोंपावेतों राहातो तोपावेतों मात्र दिव्याची संस्थिति जशी होते; पण [ या योगांत कांहीं ] वैपरीत्य झाल्यास ( यांतील एकादें कमी जास्त झाल्यास ) तो जसा अकाली मालवतो, हें. आपण पाहातों, तसा [ प्राण्यांचा ] प्राणक्षय योग्य काळापूर्वी घडतो. १६५ प्राण्यांच्या देहांतील आत्मा, स्थिरपणानें जळणाऱ्या दिव्यासारखा अंतःकरणांत असून त्यास अनंत किरण आहेत. कांहीं पांढरे, कांहीं काळे, कांहीं अनेकरंगी, आणि कांही तांबूस व जांभळे आहेत. १६६ या किरणांपैकीच जो एक उर्ध्व दिशेस असतो तो सूर्यमंडळाचा भेद करून पार जाऊन ब्रह्मलोकाचेही वर जाऊन जीवात्म्यास परमगतीस पोंचवितो. १६७ [ याशिवाय आत्म्याला ] वर जाणारे शंभर किरण असतात. त्यांचेयोगाने आ- त्म्यास देवांचीं दिव्य शरीरें व देवांची घरें प्राप्त होतात. १६८ याशिवाय खालचे दिशेस जाणारे व कमी तेजस्वी असे आणखीही किरण [ आ- [त्याला] आहेत. केलेले कर्माचा उपभोग घेण्यासाठीं त्या किरणांचे द्वारानें आत्मा परतंत्र होत्साता खाली येऊन या जगांत जन्म घेतो. १६९ वेद, शास्त्र, आत्मज्ञान, जन्म, मृत्यु, आर्ति (दुःखादिक ), हिकडून तिकडे तिकडून हिकडे जाण्यायेण्याचे फेरे, सत्य, असत्य, १७० मनोरथांची परिपूर्ति, सुखं आणि दुःखें, सुकर्मे व दुष्कर्मे, अपशकुन, भविष्यवाद, ग्रहसंयोग यांची फळे, १७१